अवकाशाचा नकाशा

ग्रहतार्‍यांचा अवकाशातील प्रवास लहानपणी मी तासंतास पहात रहायचो. पण आपण जो ग्रह किंवा तारा पहात आहोत, तो नेमका कोणता आहे? हे मला सहसा समजायचे नाही. शिवाय मंगळ, शुक्र, असे ओळखीचे ग्रहगोल देखील अनेकदा अवकाशात सापडायचे नाहीत. चंद्र कुठे आहे? तो कधी उगवेल? याबाबतही बर्‍याचदा अनभिज्ञता असायची. त्यावेळी माझ्याकडे आजच्यासारखा स्मार्टफोन असता, तर माझ्या या सार्‍या प्रश्नांची उत्तरे मला तात्काळ मिळाली असती. आज स्मार्टफोनमधील अनुप्रयोग (Application) समस्त दृष्यमान अवकाशाचा नकाशा आपल्याला दाखवू शकतो. मानवाचा प्रवास अवकाशाच्या दिशेने सुरु झाल्याचे हे जणू निदर्शकच आहे!

अवकाशाचा नकाशा
‘स्काय मॅप’ हा अनुप्रयोग अवकाशाचा नकाशा दाखवत आहे

अवकाशाचा नकाशा दाखवणारा अनुप्रयोग

अवकाशाच नकाशा पहायचा झाल्यास Sky Map या अनुप्रयोगाचा वापर करावा. हा अनुप्रयोग आपले पृथ्विवरील स्थान निश्चित करतो आणि त्या स्थानावरुन दिसणारे अवकाश आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनवर सादर करतो. आपण ज्या दिशेने आपला फोन धराल, त्या दिशेचे अवकाश आपणास आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनवर दिसेल. सोबतच अवकाशाच्या त्या भागातील ग्रह-तारे आणि त्यांची नावे देखील दिसतील. त्यामुळे आपणास हवा असलेला ग्रह,किंवा तारा हा सहजतेने सापडू शकेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.