टिव्हीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक

आजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी टिव्हीवर कोणकोणते कार्यक्रम चालू आहेत? ते आपणास झटपट एका नजरेत पाहता येत नाहीत. शिवाय आपला आवडता कार्यक्रम, चित्रपट, कलाकार, यांनुसार सहजतेने शोध घेता येत नाही. त्यामुळे कार्यक्रमांचे वेळापत्रक पहायचे असेल, तर खास त्यासाठी तयार करण्यात आलेली सेवा वापरायला हवी. त्यादृष्टीने एक अतिशय उत्कृष्ट असा पर्याय उपलब्ध आहे.

स्मार्टफोनवर कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहणे

टिव्हीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक पाहण्यासाठी आपल्या स्मार्टफोनवर What’s On India हा अनुप्रयोग स्थापित (Install Application) करा. हा अनुप्रयोग आत्तापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर स्थापित केला असून ५ हजारांहून अधिक लोकांनी मिळून त्यास ५ पैकी ४.२ गुण दिलेले आहेत.

What’s On India स्थापित केल्यानंतर त्यावर आपले एक खाते तयार (Sign up) करा. पर्यायांसाठी More वर स्पर्श करा. त्यानंतर Preferencesमध्ये या. Languagesमध्ये आपल्या भाषा नमूद करा. Operator या विभागाअंतर्गत Add Operatorवर स्पर्श करा. त्यानंतर आपण कोणत्या कंपनीचे डिश वापरता? ते नमूद करुन बदल जतन करा (Save).

आपल्या आवडीचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी हा अनुप्रयोग आपणास त्यासंदर्भात आठवण करुन देऊ शकतो. ही पूर्वसुचना आपणास कोणत्या स्वरुपात हवी आहे? ते Reminder Alertsमध्ये सांगता येईल. त्यासाठी Notification, Device Calendar, Email, SMS असे चार पर्याय देण्यात आलेले आहेत. कार्यक्रम सुरु होण्यास किती मिनिटे बाकी असताना आठवण करुन द्यायची? ते Remind Me समोरील पर्यायांचा वापर करुन सांगता येईल.

Perferences जतन करुन या अनुप्रयोगाच्या मुख्य रचनेवर या. आत्ता सध्या टिव्हीवर काय पहावे? असा जर आपणास प्रश्न पडला असेल, तर Now Next या पर्यायाचा वापर करावा. कोणत्या वाहिनीवर आत्ता काय लागले आहे? ते आपण या विभागात झटपट पाहू शकाल. चित्रपटांसाठी Movies हा स्वतंत्र विभाग देण्यात आलेला आहे. आपण आपल्या आवडेचे चित्रपट, कार्यक्रम Favorite या विभागात जतन करुन ठेवू शकतो.

वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक
स्मार्टफोनवर टिव्हीवरील वाहिनींचे वेळापत्रक – टिव्हीवरील चित्रपटांची यादी

आता कोणत्याही एका कार्यक्रमाच्या नावावर स्पर्श करावा. घड्याळाच्या चिन्हाचा वापर करुन आपण या कार्यक्रमासंदर्भातील पूर्वसूचना मिळवू शकतो. भविष्यात हा कार्यक्रम पुन्हा कधी पाहता येईल? ते Next Schedule या पर्यायाच्या माध्यमातून समजेल. शिवाय यासरखे इतर कार्यक्रम, चित्रपट कोणते? ते देखिल पाहता येईल.

आज टिव्हीवरील वाहिन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना What’s On India सारख्या सेवा अत्यंत मोलाच्या ठरतात. या सेवेचा वापर केल्यास टिव्ही पाहण्याचा अनुभव अधिक सुखद ठरु शकतो.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.