शिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग

‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी हा प्रकार खर्‍या अर्थाने सर्वत्र प्रचलित झाला. स्मार्टफोनच्या माध्यमातून फोटो घेण्यासाठी एका हातात फोन पकडावा लागतो आणि दुसर्‍या हाताने स्क्रिनला स्पर्श करावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने सेल्फी घेणे खरं तर अवघड आहे. यावर उपाय म्हणून असे काही अनुप्रयोग वापरले जातात, जे ‘व्हॉल्युम की’च्या सहाय्याने सेल्फी घेण्याची सोय करुन देतात. अशाप्रकारे सेल्फी काढत असताना ज्या हातात फोन पकडला आहे, त्याच हाताचा आंगठा किंवा बोट वापरुन सेल्फी काढता येतो व त्यामुळे एक हात मोकळा राहतो. पण याहूनही अधिक सोप्या पद्धतीने सेल्फी काढायचा असेल, तर अशा अनुप्रयोगाचा वापर करवा जो केवळ शिट्टीचा आवाज ओळखून सेल्फी काढू शकतो.

व्हिसल कॅमेरा – सहजतेने सेल्फी काढा

व्हिसल कॅमेरा
‘व्हिसल कॅमेरा’ हा अनुप्रयोग शिट्टीचा आवाज ओळखून सेल्फी घेऊ शकतो

व्हिसल कॅमेरा (Whistle Camera) हा एक शिट्टीचा आवाज ओळखून सेल्फी घेणारा अनुप्रयोग आहे. तो पाच लाखांहून अधिक लोकांनी आत्तापर्यंत आपल्या स्मार्टफोनवर घेतला असून, त्यास दहा हजारांहून अधिक लोकांनी मिळून ५ पैकी ४.३ गुण दिलेले आहेत. व्हिसल कॅमेरा हा अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर उतरवून स्थापित करा. तो उघडल्यानंतर केवळ शिट्टी वाजवा. शिट्टीचा आवाज ओळखून तो लगेच एक सेल्फी घेईल. सेल्फीस वेगवेगळे इफेक्टस देण्याची सोयही या अनुप्रयोगात करुन देण्यात आलेली आहे. व्हिसल कॅमेरा वापरल्यास सेल्फी घेण्याकरीता एकाच हाताचा वापर करावा लागतो. त्यामुळे अगदी सहजगत्या सेल्फी घ्यायचा असेल, तर त्यासाठी हा अनुप्रयोग उपयुक्त ठरतो.

आपल्याला जर शिट्टी वाजवता येत नसेल, तर या अनुप्रयोगाच्या पर्यायांमधून Sensitivity Level १ ठेवावी, आणि त्यानंतर केवळ शिट्टीसारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. अशाने आपला सेल्फी काढला जाईल. शेवटी नाहीच जमले, तर सेल्फी काढण्यासाठी ‘व्हिल्युम की’चा देखील वापर करता येतो.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.