साधासोपा इंटरनेट रेडिओ (प्रवाहवाणी)

‘इंटरनेट रेडिओ’ (प्रवाहवाणी) म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचणारा रेडिओ. नेहमीच्या रेडिओ केंद्राचे प्रसारण हे रेडिओ लहरींच्या माध्यमातून केले जाते, त्यामुळे हे प्रसारण एका ठराविक क्षेत्रापुरतेच मर्यादित असते. इंटरनेटवरुन होणार्‍या आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणावर मात्र कोणतेही क्षेत्रिय बंधन लागू पडत नाही. या पृथ्विवर अथवा पृथ्विबाहेर जिथे म्हणून इंटरनेटची सुविधा आहे, तिथे आपण इंटरनेट रेडिओ (प्रवाहवाणी) ऐकू शकतो. अमेरिकेतून अशाप्रकारे प्रसारित होणार्‍या एखाद्या रेडिओ केंद्राचा आवाज हा आपल्याइथेही अगदी तिथल्याइतकाच सुष्पट ऐकू येतो.

सिम्पल रेडिओ – प्रवाहवाणी

पूर्वी आपल्याला घड्याळ, कॅलेंडर, वही, इत्यादी अनेक वस्तू विकत घ्यावा लागत होत्या. आता हळूहळू या वस्तूंची जागा स्मार्टफोनमधील अ‍ॅप घेऊ लागले आहेत. रेडिओ देखील याला अपवाद नाही. इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरीता गूगल प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत. आज आपण त्यापैकी वापरण्यास अत्यंत सोप्या अशा रेडिओ अ‍ॅपची माहिती घेणार आहोत. ‘सिम्पल रेडिओ’ असे या अ‍ॅपचे नाव आहे.

Simple Radio by Streema हे अ‍ॅप आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. हे एक मोफत अ‍ॅप आहे आणि यात जाहिराती आहेत. आपल्याला जर जाहिराती नको असतील, तर आपण ते साधारण १२५ रुपयांना विकत घेऊ शकाल. ‘सिम्पल रेडिओ’ आजतागायत १० लाखांहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर घेतले असून १५ हजारांहून अधिक लोकांनी मिळून यास ५ पैकी ४.३ गुण दिलेले आहेत.

इंटरनेट रेडिओ (प्रवाहवाणी)
सिम्पल रेडिओ

‘सिम्पल रेडिओ’ उघडल्यानंतर उजव्या बाजूस वर आपल्याला शोध घेण्याची सोय दिसेल; त्यावर स्पर्श करा. इथे Marathi असे टाईप केल्यास आपल्याला एक मराठी प्रवाहवाणी केंद्र सापडेल. हे ‘प्रवाहवाणी केंद्र’ (Internet Radio Station) थेट अमेरिकेहून प्रसारित होते, तरीही अत्यंत सुस्पष्ट आवाजात ऐकू येते. यावर सहसा मराठी गाणी लागलेली असतात.

तार्‍याच्या चिन्हावर स्पर्श करुन आपल्याला एखादे प्रवाहवाणी केंद्र Favorite या विभागात जोडता येईल. जेणेकरुन पुढच्यावेळी आपल्याला ते चटकन सापडेल. या अ‍ॅपच्या संग्रहात जगभरातील २५ हजारांहून अधिक प्रवाहवाणी केंद्रे आहेत.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.