सॅमसंग गॅलक्सी ऑन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलक्सी ऑन हा स्मार्टफोन नुकताच बाजारात आला आहे. तेंव्हा आपल्याला जर ८ – १० हजार रुपयांच्या आसपास सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन विकत हवा असेल, तर ‘सॅमसंग गॅलक्सी ऑन’ या फोनचा विचार करावा. ‘सॅमसंग गॅलक्सी ऑन ५’ आणि ‘सॅमसंग गॅलक्सी ऑन ७’ या दोन आवृत्यांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. त्यापैकी ‘ऑन ५’ची किंमत साधारणतः ९ हजार रुपये इतकी असून ‘ऑन ७’ची किंमत जवळपास ११००० रुपये आहे. आजच्या या लेखात आपण या दोन स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये पाहणार आहोत व सोबतच त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करणार आहोत. अशाप्रकारे तुलना केल्याने आपल्याला नक्की कोणता स्मार्टफोन हवा आहे? ते ठरवणे सोपे जाईल.

सॅमसंग गॅलक्सी ऑन ७
सॅमसंग गॅलक्सी ऑन ७ स्मार्टफोन असा दिसतो

सॅमसंग गॅलक्सी ऑन ५ व सॅमसंग गॅलक्सी ऑन ७ स्मार्टफोन्सची तुलना

खाली ऑन ५ व ऑन ७ या स्मार्टफोन्सची तुलना करणारा तक्ता दिलेला आहे. यात उभ्या रांगेत स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये आहेत, तर आडव्या रांगेत स्मार्टफोन्सची नावे आहेत. हा तक्ता कदाचित स्मार्टफोनवर व्यवस्थित दिसणार नाही. तेंव्हा आपल्या स्मार्टफोनवर जर हा तक्ता व्यवस्थित दिसत नसेल, तर वेब ब्राऊजरच्या पर्यायांमधून Desktop View हा पर्याय निवडावा. संगणकावर आणि टॅबवर मात्र खालील तक्ता व्यवस्थित दिसेल.

वैशिष्ट्ये / स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी ऑन ५ सॅमसंग गॅलक्सी ऑन ७
किंमत (सुमारे) ९००० रुपये ११००० रुपये
ऑपरेटिंग सिस्टिम (OS) अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप
प्रोसेसर १.३ GHz + Exynos ३४७५, क्वॉड कोअर १.२ GHz + Qualcomm Snapdragon 410, क्वॉड कोअर
रॅम व मेमरी १.५ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी १.५ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी
कॅमेरा ८ मेगापिक्सल मुख्य, ५ मेगापिक्सल समोरचा कॅमेरा १३ मेगापिक्सल मुख्य, ५ मेगापिक्सल समोरचा कॅमेरा
स्क्रिन स्क्रिनचा आकार – ५ इंच, रिझोल्युशन – १२८० X ७२० पिक्सल स्क्रिनचा आकार – ५.५ इंच, रिझोल्युशन – १२८० X ७२० पिक्सल
आकार व वजन स्मार्टफोनचा आकार – १४.२३ सेमी उंची X ७.२१ सेमी लांबी X ०.८५ सेमी जाडी, वजन – १४९ ग्रॅम स्मार्टफोनचा आकार – १५.१८ सेमी उंची X ७.७५ सेमी लांबी X ०.८२ सेमी जाडी, वजन – १७१ ग्रॅम
बॅटरी Li-Ion, २६०० mAh Li-Ion, ३००० mAh
एकूण सिम – ३जी/४जी ड्युअल सिम, LTE + LTE, ४जी ड्युअल सिम, LTE + LTE, ४जी
वॉरंटी उपकरणासाठी १ वर्ष, अ‍ॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने. उपकरणासाठी १ वर्ष, अ‍ॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.

काही अपवाद वगळता हे स्मार्टफोन प्रत्यक्ष विकत घेणार्‍या लोकांनी ते चांगले असल्याचे नमूद केले आहे. आपल्यापैकी कोणी जर यापैकी एखादा स्मार्टफोन वापरत असेल, तर खाली प्रतिक्रियेत आवर्जून आपला अनुभव विषद करावा.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.