स्मार्टफोनवर मराठी लेखन

स्मार्टफोनवर मराठी लिहिता येऊ लागल्याने आता इंटरनेटवर मराठी मजकूराचे प्रमाण वाढलेले आहे. ही एक निश्चितच चांगली व स्वागतार्ह बाब आहे. स्मार्टफोनवर मराठी लिहायचे झाल्यास गूगलचा कीबोर्ड सर्वोत्तम आहे! गूगलचे एकंदरीत तीन कीबोर्ड आहेत, जे आपणास मराठी लिहिण्याकरिता उपयोगी ठरु शकतात. त्यापैकी दोन कीबोर्ड हे अधिक चांगले आहेत व उर्वरीत कीबोर्ड हा प्ले स्टोअरवरील इतर कोणत्याही कीबोर्डप्रमाणे सर्वसाधारण स्वरुपाचा आहे.

स्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत’ या लेखातून मी Google Handwriting Input या गूगलच्या त्यापैकी एका कीबोर्डसंदर्भात यापूर्वीच सविस्तर माहिती दिलेली आहे. हा कीबोर्ड वापरुन आपण बोटाने कीबोर्डच्या स्क्रिनवर मराठी प्रत्यक्ष लिहू शकतो. Google Keyboard या दुसर्‍या कीबोर्डमध्येही मराठी टंकलेखनाची सोय आहे, पण ती तितकीशी विकसित नाही. त्यामुळे मराठीसाठी हा कीबोर्ड वापरण्यात तसा अर्थ नाही.

गूगल इंडिक कीबोर्ड
गूगल इंडिक कीबोर्ड

गूगलचा तिसरा कीबोर्ड हा Google Indic Keyboard नावाने ओळखला जातो. पूर्वी या कीबोर्डचे Hindi Keyboard असे नाव होते, पण गूगलने आता त्याचे नामकरण Google Indic Keyboard असे केले आहे. कारण त्याच्या नवीन आवृत्तीत इतर भारतीय भाषांचाही समावेश करण्यात आलेला आहे. आपण अजूनही कालबाह्य हिंदी कीबोर्ड वापरत असाल, तर प्ले स्टोअरमधून तो अद्यान्वित (Update) करा! त्यानंतर आपल्याला या कीबोर्डसाठी खास आपल्या ‘मराठी’ भाषेची निवड करता येईल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.