क्रिकेटचे मराठी अ‍ॅप

क्रिकेटची आवड असणार्‍यांमध्ये cricbuzz हे संकेतस्थळ लोकप्रिय आहे. या संकेतस्थळाचे गूगल प्ले स्टोअरमध्ये दोन अ‍ॅप आहेत. त्यापैकी एका अ‍ॅपचे नाव आहे, Cricbuzz – In Indian Languages. हे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करुन मराठी भाषेची निवड केल्यास आपल्याला क्रिकेटचा धावफलक आणि इतर माहिती ही आपल्या मराठी भाषेत दिसू लागेल.

आत्ता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा क्रिकेटचा सामना सुरु असून त्या क्रिकेट सामन्याचा मराठी धावफलक आपल्याला खालील चित्रात दिसत आहे. या अ‍ॅपचे मराठी भाषांतर हे सध्या तितकेसे अचूक नाही. पण कालपरत्वे त्यात सुधारणा होईल अशी अशा आहे.

क्रिकेटचा मराठी धावफलक
मराठी भाषेतून दिसणारा क्रिकेटचा धावफलक

गूगल प्ले स्टोअरमधील अनेकानेक अँड्रॉईड अ‍ॅप हे भाषांतरासाठी खुले आहेत. अशाप्रकारे भाषांतर करण्यात ‘हिंदी’ आणि ‘बंगाली’ लोक फार पुढे आहेत! तेंव्हा आपल्यापैकी भाषांतराची आवड असणार्‍यांनी कमीतकमी आपल्या आवडत्या अ‍ॅपचे मराठी भाषांतर करण्याबाबत विचार करावा.

दुसरे असे की, ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ मराठीमधून वापरण्याची सोय असूनही आपल्यापैकी साधरणतः केवळ दोन टक्के लोक मराठीचा वापर करतात. मी स्वतः फेसबुक आणि ट्विटर मराठी भाषेतून वापरतो, आणि माझं आपल्याला आवाहन आहे की, कृपया आपणही ही संकेतस्थळे मराठी भाषेतून वापरावित. त्यासंदर्भात अधिक माहिती हवी असेल, तर हा लेख वाचावा – फेसबुक आणि ट्विटर मराठीतून!.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.