पॉडकास्ट म्हणजे काय?

‘ध्वनिफीत’ (Audio) अथवा ‘चित्रफीत’ (Video) या माध्यमांतून इटंरनेटवरुन जे कार्यक्रम प्रसारित केले जातात, त्यास ‘पॉडकास्ट’ असे म्हणतात. अ‍ॅपलच्या iPod (आयपॉड) वरुन ‘पॉडकास्ट’ या नावाचा उगम झाला आहे. परदेशात ‘पॉडकास्ट’ हा प्रकार लोकप्रिय असून अनेक हौशी तसेच व्यावसायिक लोक हे स्वतःचे कार्यक्रम तयार करुन अशाप्रकारे इंटरनेटवरुन प्रसारित करतात.

पॉडकास्ट हा देखील ब्लॉगसारखाच एक प्रकार असून याचे वैशिष्ट असे की, यात मजकूरचा (Text) प्रामुख्याने वापर न कराता त्याऐवजी ध्वनिफीत, चित्रफीत यांचा वापर केला जातो. एका पॉडकास्टच्या माध्यमातून प्रसारित केले जाणारे कार्यक्रम हे सहसा एकाच ‘फाईल फॉरमॅट’ मध्ये असतात. उदाहरणार्थ, mp3 फाईल फॉरमॅट.

पॉडकास्ट ऐकण्याकरीता अँड्रॉईड अ‍ॅप स्टोअरवर अनेकानेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून आपण आपल्या आवडीचे पॉडकास्ट्स ‘सब्स्क्राईब’ करु शकतो. पॉडकास्ट मार्फत प्रसारित होणारे कार्यक्रम हे सहसा डाऊनलोड करता येतात. त्यामुळे आपणास ते आपल्या सोयीने ऐकता येतात.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.