स्मार्टफोन विजिट म्हणजे काय?

शब्दकोशानुसार एखाद्या विशिष्ट कामाकरिता उपयुक्त असलेले उपकरण (Device) किंवा नियंत्रक (Control) याला ‘विजिट’ (Widget) असे म्हणतात. याच अनुशंगाने पण खास स्मार्टफोन संदर्भात आपल्याला ‘विजिट’ या शब्दाचा अर्थ पहायचा आहे. आजकाल स्मार्टफोनसाठी हजारो अ‍ॅप्स उपलब्ध आहे. त्यापैकी काही अ‍ॅप्स हे विजिटची सुविधा पुरवतात. विजिटमुळे एखादे विशिष्ट अ‍ॅप हे प्रत्यक्ष न उघडता थेट स्मार्टफोनच्या स्क्रिनवरुन हाताळता येते, नियंत्रित करता येते. उदाहरणाने ही गोष्ट अधिक व्यवस्थित समजेल.

स्मार्टफोन विजिटचे उदाहरण

समजा आपण हवामानविषयक एखादे अ‍ॅप इन्स्टॉल केले आहे. आता आपल्याला हवामान पहायचे झाल्यास आपल्याला ते अ‍ॅप उघडावे लागेल. पण ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याऐवजी थेट स्मार्टफोनच्या स्क्रिनवरच जर आपल्याला हवामानाची माहिती दिसली तर? अशाने हवामानाचा अंदाज हा सतत आपल्यासमोर उपलब्ध राहिल आणि आपल्या स्मार्टफोनची स्क्रिनही चांगली दिसेल. एखाद्या अ‍ॅपमार्फत अशाप्रकारे करुन देण्यात आलेल्या सुविधेला ‘विजिट’ असे म्हणतात. विजिटमुळे आपल्या स्मार्टफोनची उपयुक्तता आणि सौंदर्य अशा दोन्ही गोष्टींमध्ये भर पडते.

हवामान विजिट
हवामानाचे स्मार्टफोनवरील एक विजिट

स्मार्टफोन विजिट

अँड्रॉईड फोनवर इन्स्टॉल केलेल्या काही अ‍ॅप्ससोबत एक किंवा त्याहून अधिक विजिट्स देण्यात आलेले असतात. पण गूगल प्ले स्टोअरमध्ये केवळ विजिटकरता तयार करण्यात आलेले स्वतंत्र अ‍ॅप्लिकेशन्स देखील आहेत. एखादे विजिट जर स्क्रिनवर घ्यायचे असेल, तर ते कसे घेता येईल? या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे, कारण वेगवेगळ्या स्मार्टफोनची कार्यरचना ही वेगवेगळी असते. त्यामुळे स्मार्टफोनच्या पर्यायांमधून आपल्या स्वतःलाच Widget असा पर्याय शोधून काढावा लागेल. तिथे निरनिराळे विजिट्स दिसतील. त्यांपैकी आपल्या आवडीचे विजिट्स आपल्याला आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रिनवर घेता येतील.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.