SBIकडून ऑफलाईन OTP

OTP म्हणजे One Time Password. ऑनलाईन व्यवहारात सुरक्षितता निर्माण व्हावी याकरिता त्याचा वापर केला जातो. One Time Password (OTP) हा केवळ एकदाच उपयोगात येतो, म्हणून त्यास तसे नाव देण्यात आलेले आहे. सहसा OTP हा SMSद्वारे आपल्या मोबाईलवर पाठवला जातो. पण अशाप्रकारची पद्धत ही पूर्णतः आपल्या मोबाईल नेटवर्कच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. कारण आपला फोन जर नेटवर्कच्या बाहेर असेल, तर आपल्याला OTPचा SMS मिळू शकणार नाही, आणि त्यायोगे आपणास आपला ऑनलाईन व्यवहार पूर्ण करता येणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया - OTP
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवहारासाठी आता ऑनलाईन अथवा ऑफलाईन OTP मिळवता येऊ शकतो.

SBIमार्फतही ऑनलाईन व्यवहारांसाठी OTPचा वापर केला जातो. SBIचे जगभरात करोडो ग्राहक आहेत. तेंव्हा सहाजिकच अनेक ठिकाणी त्यांच्या ग्राहकांना मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत असणार! यावर तोडगा म्हणून SBI म्हणजेच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने OTPसाठी एक स्वतंत्र अनुप्रयोग (Application) तयार केला आहे. State Bank Secure OTP असे SBIच्या या नवीन अनुप्रयोगाचे नाव आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून इंटरनेटसहित किंवा इंटरनेटशिवाय OTP तयार करता येऊ शकतो. या अनुप्रयोगाच्या माध्यमातून OTP मिळविण्यासाठी मोबाईल नेटवर्कची काहीही आवश्यकता नाही. अधिक माहिती या इथे मिळेल (इंग्लिश) – State Bank Secure OTP App.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.