SBI नेटबँकिंगचे खाते SBI क्रेडिट कार्डशी जोडा

ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत असताना अनेकदा ‘क्रेडिट कार्ड’ हाच एकमेव पर्याय आपल्याला देण्यात येतो. विशेषतः जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहारांना ही गोष्ट लागू पडते. याशिवाय ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर अनेकदा क्रेडिट कार्ड वापरुन खरेदी करण्याच्या मोबदल्यात मूळ किंमतीवर काही सूट देण्यात येते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपण अगदी मर्यादित काळासाठी बँकेकडून पैसे उसने घेतो आणि त्यानंतर ते पैसे बँकेस परत करतो. बँकेला पैसे परत करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी SBI नेटबँकिंग हा देखील एक मार्ग आहे. म्हणूनच SBI नेटबँकिंगच्या माध्यमातून SBI क्रेडिट कार्डचे बिल कसे भरायचे? याची आपणास माहिती घ्यायची आहे. पण तत्पूर्ती SBI नेटबँकिंगचे खाते SBI क्रेडीट कार्डशी कसे जोडायचे? ते आत्ता आपण पाहणार आहोत.

SBI नेटबँकिंग क्रेडिट कार्डशी जोडण्याकरिता पायर्‍या

१. onlinesbi.com वर जाऊन ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) मध्ये लॉग-इन करा.
२. वरच्या मेनूबारमधून Bill Payments हा पर्याय निवडा.
३. आता डाव्या बाजूच्या साईडबारमधून Manage Biller वर क्लिक करा.
४. Manage Billerमध्ये Add वर क्लिक करा.
५. All India Billers हा पर्याय पूर्वीपासूनच निवडलेला असेल, तो तसाच राहू द्या. Biller Name मधून “SBI Cards and Payment Services Pvt Ltd” निवडून Go वर क्लिक करा.
६. आता आपले नाव, क्रेडिट कार्ड क्रमांक अशी माहिती भरुन ती Submit करा.
७. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर एक Verification Code येईल, तो वापरा. अशाने आपण भरलेल्या माहितीची पडताळणी होऊन आपले क्रेडिट कार्ड हे आपल्या नेटबँकिंगच्या खात्याशी जोडले जाईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया - ऑनलाईन बँकिंग
SBI नेटबँकिंगशी SBI क्रेडिट कार्ड जोडून घ्या

ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता आपणास SBI नेटबँकिंगच्या खात्यामधून SBI क्रेडिट कार्डचे बिल भरता येईल. पण हे बिल नक्की कसे चुकते करायचे? ते आपण पुढील लेखात पाहू.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.