गूगलमध्ये तंतोतंत शोध घेणे
गूगलमध्ये जर एखाद्या शब्दाचा अथवा शब्दप्रयोगाचा तंतोतंतपणे शोध घ्यायचा असेल, तर तो कसा घ्यायचा? ते आज आपण पाहणार आहोत. गूगलमध्ये तंतोतंत शोध घेण्याकरिता वापरली जाणारी ही क्लुप्ती जर आपल्याला समजली, तर त्यामुळे आपण भविष्यात गूगलच्या माध्यमातून अधिक चांगल्याप्रकारे शोध घेऊ शकाल. अशाने आपला वेळ तर वाचेलच शिवाय समोर येणार्या लाखो शोध परिणामांतून (Search Results) आपल्याला ईच्छित असा शोध परिणाम सहजतेने सापडू शकेल. गूगलमध्ये शोध घेत असताना या क्लुप्तीचा कौशल्याने कसा वापर करायचा? ते आपल्यावर अवलंबून आहे.
‘कीवर्ड’ अनुसार तंतोतंत शोध घेणे
गूगलच्या माध्यमातून शोध घेण्याकरिता आपण सर्च बॉक्समध्ये जे शब्द टाकतो त्यास ‘कीवर्ड’ (Keyword) असे म्हणतात. गूगल हे एक अत्यंत हुशार सर्च इंजिन आहे. हे सर्च इंजिन सांगकाम्याप्रमाणे काम करत नाही. तर आपल्याला नक्की काय म्हणायचं असेल? आपल्याला नेमकं काय हवं असेल? याचे मोठ्या चाणाक्षपणे आकलन करुन तो आपल्यासमोर योग्य असे शोध परिणाम घेऊन येतो. तरीही कधीकधी त्याचा उपयुक्त असा हा चाणाक्षपणाच अनावश्यक ठरतो. कारण काही विशिष्ट प्रकारची कामे करण्याकरिता सांगकाम्याचीच आवश्यकता असते.
गूगलमध्ये नेहमीप्रमाणे शोध घेतला असता केवळ तंतोतंत असे शोध परिणाम समोर न येता उपयुक्त असे शोध परिणाम आपल्या समोर येतात. पण गूगलमध्ये शोध घेत असताना जर आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला, तर समोर येणारे सर्व शोध परिणाम हे कीवर्डशी तंतोतंत जुळणारे असतात. ही गोष्ट थेट उदाहरणाच्या सहाय्याने अधिक चांगल्याप्रकारे समजेल.
उदाहरणार्थ –
आपण गूगलमध्ये जर मराठी भाषा सुंदर आहे असा शोध घेतला, तर आपल्यासमोर जे शोध परिणाम येतील, ते चाणाक्ष गूगलचे शोध परिणाम असतील. त्यात तंतोतंत अशा शोध परिणामांसोबतच कीवर्डच्या अनुशंगाने जवळपास पोहचणारे शोध परिणामही मिसळलेले असतील. चित्र १ पहा.
दुसर्या बाजूला आपण “मराठी भाषा सुंदर आहे” असा दुहेरी अवतरणचिन्हासहित शोध घेतला, तर गूगल सांगकाम्याप्रमाणे काम करेल. यावेळी तो अगदी कीवर्ड अनुसार तंतोतंत असे शोध परिणाम आपल्यासमोर घेऊन येईल. त्यात कीवर्डच्या अनुशंगाने जवळपास पोहचणारे शोध परिणाम मिसळलेले नसतील. चित्र २ पहा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016