ट्विटर मराठी संमेलन

ट्विटरवर आपले मनोगत हे एकावेळी १४० कॅरॅक्टर्समध्ये व्यक्त करावे लागते. अक्षर, अंक, चिन्ह, स्पेस या सार्‍यांचा कॅरॅक्टर्स अंतर्गत समावेश होतो. १४० कॅरॅक्टर्सची मर्यादा हे ट्विटरचं वेगळेपण आहे, त्याची ओळख आहे. पण केवळ १४० कॅरॅक्टर्समध्ये व्यक्त होणं अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे ते ट्विटरचा फारसा वापर करत नाहीत. परिणामी ट्विटरचे वापरकर्ते (Users) फेसबुकच्या तुलनेत कमी आहे. पण जितके वापरकर्ते कमी असतील, तितके उत्पन्न देखील कमी मिळते. त्यामुळे ट्विटर आता १४० कॅरॅक्टर्सची मर्यादा हटवण्याचा गांभिर्याने विचार करत आहे. ही मर्यादा हटवल्यास आपल्याला ट्विटरवर १० हजार कॅरॅक्टर्समध्ये आपले मनोगत मांडता येईल.

असो! १५ ते १८ जानेवारी दरम्यान पुण्याशेजारी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ होणार आहे. संबंधित कार्यक्रमांचे वेळापत्रक हे मी लवकरच फेसबुकवरुन प्रकाशित करेन. ज्यांना शक्य आहे, त्यांनी आवर्जून साहित्य संमेलनात सहभाग नोंदवावा! पण ज्यांना पिंपरी-चिंचवडला भेट देणे शक्य होणार नाही, त्यांना ट्विटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या संमेलनात सहभागी होता येईल. Marathi Wordने याकरिता ट्विटरवर पुढाकार घेतलेला आहे. त्यादृष्टीने विविध विषयांना अनुसरुन १२ हॅशटॅगही देण्यात आलेले आहेत. आपल्याला हॅशटॅग संदर्भात माहिती नसेल, तर ‘हॅशटॅग म्हणजे काय?’ हा लेख वाचावा!

मराठी भाषा संमेलन
ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१६ – १२ हॅशटॅग

कला आणि साहित्याने माणसाचे मन समृद्ध होते. समृद्ध मन यशाची नवी उंची गाठते! म्हणूनच कला आणि साहित्य हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा सक्रिय घटक असायला हवेत. सोशल नेटवर्कमुळे चांगल्या विचारांची देवाण-घेवाण वाढीस लागली आहे. तेंव्हा आपल्यापैकी अधिकाधिक लोक मराठी भाषेच्या या उत्सवात सहभागी होतील अशी आशा आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.