मराठी इंटरनेट अनुदिनी

साधारणतः मागील दोन महिन्यांपासून मी ‘मराठी इंटरनेट’चं फेसबुक पान रोज अद्यान्वित (Update) करत आहे. फेसबुकसोबतच ट्विटर, गूगल प्लस व टम्बलर येथील पानेही रोजच्या रोज अद्यान्वित होतात. या दोन महिन्यांत जवळपास १०० पोस्ट ‘सोशल नेटवर्क’वरुन प्रकाशित झालेल्या आहेत. पण अखेर सोशल नेटवर्क हे काही लेखनाचे खास माध्यम नाही. त्यामुळे तिथे माहिती प्रकाशित करत असताना अनेक अडचणी उद्भवतात.

याच कारणाने कालपासून मी ‘मराठी इंटरनेट’च्या या नवीन अनुदिनीवरुन लिहिण्यास सुरुवात केली आहे. अनुदिनीवर लेख लिहिल्याने माहिती वाचण्याकरीता दरवेळी आपल्याला सोशल नेटवर्कवरुन या अनुदिनीवर यावे लागेल, याची मला कल्पना आहे. पण एकंदरीत सगळ्या बाजूने विचार केला असता, सोशल नेटवर्कवरील लेखन थांबवून अनुदिनीवर लिहिण्यास सुरुवात करणं गरजेचं होतं.

आपण फेसबुकवर अथवा या अनुदिनीवर आपले प्रश्न विचारु शकाल किंवा आपले मत मांडू शकाल. यापुढे ‘मराठी इंटरनेट’च्या माध्यमातून प्रकाशित झालेली माहिती शोधणे आपणास अधिक सोपे जाईल. शिवाय फेसबुक अथवा इतर सोशल नेटवर्कवर आपल्याला अवलंबून रहावे लागणार नाही. आपल्या स्मार्टफोन अथवा संगणकावर वेब ब्राऊजर उघडून अ‍ॅड्रेस बारमध्ये marathiinternet.in असे टाईप करुन या अनुदिनीला थेट भेट देता येईल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.