मराठी कार्यक्रमांचा ऑनलाईन विभाग
युट्यूबवर मराठी चित्रपटांकरीता एक स्वतंत्र विभाग असल्याचं मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं आहे. पण त्यावर मराठी कार्यक्रमांसाठी देखील एक वेगळा विभाग असल्याचं आपल्याला माहित आहे का? युट्यूबवर मराठी कार्यक्रमांसाठी एक खास विभाग असून आपण या विभागास सब्स्क्राईब (Subscribe) देखील करु शकतो.
मराठी कार्यक्रमांचा विभाग
युट्यूबवर (YouTube) प्रत्येक मराठी कार्यक्रमाचे स्वतःचे असे एक चॅनल आहे. मराठी कार्यक्रमांच्या विभागात या सर्व चॅनल्सची म्हणजेच कार्यक्रमांची योग्य तर्हेने मांडणी करण्यात आलेली आहे. यात टिव्हीवर सध्या सुरु असलेल्या आणि नसलेल्या अशा अनेकानेक कार्यक्रमांचा समावेश आहे. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, असे पूर्वप्रसारित जुने लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा पहायचे असल्यास या ऑनलाईन विभागास आवर्जून भेट द्यावी.
युट्यूबवर कार्यक्रम पाहण्याचे ५ फायदे!
- टिव्हीवरील आपल्या आवडीचे पूर्वप्रसारित जुने कार्यक्रम पुन्हा पाहता येतात.
- सध्या रोज प्रसारित होणारे कार्यक्रम आपल्या सवडीने बघता येतात.
- इथे अत्यंत तुरळक जाहिराती असल्याने ३० मिनिटांचा कार्यक्रम अगदी २० मिनिटांत संपतो.
- युट्यूवरील कार्यक्रम आपण आपल्या स्मार्टफोनवर किंवा स्मार्टटिव्हीवर देखील पाहू शकतो.
- कार्यक्रमातील नको असलेला भाग पुढे ढकलता येतो, किंवा आवडलेला भाग पुन्हा पाहता येतो.
युट्यूबवरील मराठी कार्यक्रमांचा विभाग या इथे आहे – Marathi TV Shows.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016