मोबाईल विकत घेण्याची सूवर्णसंधी!

सध्या ‘फ्लिपकार्ट’ने The Big Billion Days योजनेंतर्गत पुढाकार घेऊन अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याला जर एखादा मोबाईल अथवा एखादे उपकरण घ्यायचे असेल, तर आज त्याकरीता एक चांगला दिवस आहे. ऑनलाईन खरेदी ही आज नेहमीपेक्षाही अधिक स्वस्त पडेल.

परंतु वस्तूंवर देण्यात आलेल्या या सवलती ह्या केवळ फ्लिपकार्टच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. तेंव्हा आपल्याला स्वस्तात खरेदी करायची असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम फ्लिपकार्टचे अ‍ॅप उतरवून (Download) घ्यावे लागेल. त्यानंतर हे अ‍ॅप उघडल्यास अनेकानेक आकर्षक सवलती दिसून येतील.

आपण जर सिटिबँकेचे क्रिडिट कार्ड; स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे डेबिड कार्ड, क्रेडीट कार्ड; किंवा यस बँकेचे डेबिट कार्ड वापरुन खरेदी केली, तर काही अटींवर १०% अतिरिक्त सवलत मिळेल. The Big Billion Days ही योजना १७ तारखेपर्यंत चालणार असून तोपर्यंत फ्लिपकार्टतर्फे दररोज विविध वस्तूंवर सवलत देण्यात येणार आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.