वर्ड फाईल PDFमध्ये बदलणे
वर्ड आणि PDF हे दोन अत्यंत लोकप्रिय फाईल फॉरमॅट आहेत. दैनंदिन कामकाजात अशाप्रकारच्या फाईल्सचा सातत्याने वापर केला जातो. कधीकधी आपल्याजवळ एखादी वर्ड फाईल असते, जी आपणास PDF स्वरुपात हवी असते. अशावेळी वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतरण कसे करता येईल? ते आज आपणास पहायचे आहे.
वर्ड फाईल PDFमध्ये बदलण्यासाठी आपण Google Docs ही गूगलची सेवा वापरणार आहोत. त्यामुळे यासाठी कोणतेही विशिष्ट सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर घेण्याची आवश्यकता नाही. पण ही एक ऑनलाईन प्रक्रिया असल्याने याकरिता आपणास इंटरनेटची आवश्यकता भासेल.
‘गूगल डॉक्स’ वापरण्यासाठी गूगलचे (जीमेलचे) खाते असणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश लोक ईमेलकरिता जीमेलचा वापर करतात, तेंव्हा जीमेलचा ईमेल आणि पासवर्ड आपण ‘गूगल डॉक्स’साठी वापरु शकाल.
Start a new document खाली आपल्याला अधिकचे चिन्ह असलेले Blank document दिसेल, त्यावर क्लिक करा. एक नवीन ऑनलाईन वर्ड फाईल उघडली जाईल. आपल्या संगणकावरील वर्ड फाईलमधील मजकूर कॉपी करा आणि उघडल्या गेलेल्या ऑनलाईन वर्ड फाईलमध्ये पेस्ट करा.
ऑनलाईन वर्ड फाईलमधील मजकूराचे आपल्या गरजेप्रमाणे फॉरमॅटिंग करा. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे मेनूबारमधील File या पर्यायावर जाऊन Download as – PDF document (.pdf) या पर्यायाची निवड करा.
अशाप्रकारे आपल्या वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतर होईल व त्यानंतर रुपांतरीत फाईल आपल्या संगणकावर उतरवली जाईल (Download होईल). वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतरण करण्याची ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016