विकिपीडियावरील लेख उतरवणे

विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. तो मराठी, इंग्लिशसहित जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकिपीडियाचा प्रकल्प हा उत्स्फुर्तपणे चालवला जातो. देणगीच्या स्वरुपात मिळालेल्या पैशांतून या प्रकल्पाचे कामकाज चालते. पण त्यावर आढळणारी माहिती ही इंटरनेटचा वापर करणार्‍या लोकांनी स्वयंस्फूर्तीने लिहिलेली असते. आपल्यापैकी कोणीही विकिपीडिया संकेतस्थळावरील माहितीत भर घालू शकतो. विकिपीडियाने नेमलेले संपादक आवश्यकता भासल्यास या माहितीचे संपादन करतात. विकिपीडियावरील माहिती ही बर्‍याच अंशी अचूक असते. पण ती पूर्णतः अचूक असते, असे मात्र ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे संदर्भ म्हणून विकिपीडियाचा वापर करत असताना मिळालेल्या माहितीची विश्वासार्हता ही इतर स्त्रोतांशी पडताळणी करुन ठरवावी.

विकिपीडियावरील लेख उतरवणे

PDF हा फाईलचा प्रकार सर्वांना ज्ञातच आहे. अनेक ईपुस्तके ही PDF स्वरुपात उपलब्ध असतात. लिखित स्वरुपातील मजकूर PDF स्वरुपात वाचणे अथवा पाठवणे हे अनेकदा सोयीचे ठरते. विकिपीडियावरील लेख देखील अगदी सहजरित्या PDF स्वरुपात संगणकावर उतरवता येतात, म्हणजेच डाऊनलोड करता येतात.

त्यासाठी संगणकावरील वेब ब्राऊजरच्या सहाय्याने mr.wikipedia.org या संकेतस्थळावर जा आणि माहितीपूर्ण असा कोणताही एक लेख उघडा. आता खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्यासमोर एक पान असेल. त्या पानाच्या डाव्या बाजूला एक साईडबार दिसेल. त्यातील “PDF म्हणून उतरवा” या पर्यायाचा शोध घ्या आणि त्यावर क्लिक करा. त्यानंतर विकिपीडियावरील लेख PDF फाईलच्या स्वरुपात आपल्या संगणकावर उतरवला जाईल.

विकिपीडियावरील लेख PDF
विकिपीडियावरील लेख हे PDF स्वरुपात उतरवता येतात

आपण जर स्मार्टफोन किंवा टॅब वापरत असाल, तर वेब ब्राऊजरमध्ये Desktop Viewची निवड करा. अशाने आपल्याला विकिपीडियाचे संकेतस्थळ हे संगणकावर दिसते, त्या स्वरुपात दिसेल. त्यानंतर विकिपीडियावरील लेखाची PDF फाईल मिळवण्यासाठी वर नमूद केलेली कृती करा. अशाप्रकारे आपण इंग्लिश विकिपीडियावरील लेखही जतन करु शकतो. त्यासाठी Download as PDF या पर्यायाचा वापर करावा.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.