गूगलमध्ये संकेतस्थळांतर्गत शोध घेणे
इंटरनेटवर लाखो संकेतस्थळं आहेत. गूगलमध्ये शोध घेत असताना अशा लाखो संकेतस्थळांमधून उपयुक्त शोध परिणाम आपल्या समोर आणले जातात. पण समजा आपल्याला गूगलचा वापर करुन एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाच्या अंतर्गत शोध घ्यायचा आहे, तर काय करावे लागेल? उदाहरणार्थ, गृहित धरा की गूगलच्या सहाय्याने आपल्याला marathiinternet.in या आपल्या संकेतस्थळांतर्गत शोध घ्यायचा आहे, तर अशावेळी काय करता येईल? याकरिता एक क्लुप्ती आहे, जिच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाच्या पानांतर्गत शोध शोध घेता येईल.
संकेतस्थळाच्या अंतर्गत शोध घेण्याची क्लुप्ती
काल मी आपल्याला दुहेरी अवतरणचिन्हाची क्लुप्ती सांगितली होती. अगदी त्याचप्रमाणे आजही आपण गूगल सर्च इंजिनच्या अनुशंगाने एक क्लुप्ती वापरणार आहोत. गूगलमध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट संकेतस्थळांतर्गत शोध घ्यायचा असेल, तर सर्च बॉक्समध्ये प्रथम असे लिहा, site:इथे’संकेतस्थळाचा’पत्ता.
उदाहरणार्थ – आपल्याला जर marathiinternet.in या माझ्या संकेतस्थळांतर्गत शोध घ्यायचा असेल, तर site:marathiinternet.in असे टाईप करा. त्यानंतर एक स्पेस द्या आणि आपल्याला ज्या विषयाबद्दल शोध घ्यायचा असेल, त्यासंदर्भात काही शब्द लिहा. उदाहरणार्थ, आपल्याला जर स्मार्टफोनबाबत शोध घ्यायचा असेल, तर खाली दाखवले आहे त्याप्रमाणे लिहा.
site:marathiinternet.in स्मार्टफोन
गूगलमध्ये अशारितीने शोध घेतल्यास marathiinternet.in या संकेतस्थळावर मी स्मार्टफोन संदर्भात जे काही लेख लिहिले असतील ते आपल्या समोर येतील.
ही क्लुप्ती आपण इतर कोणत्याही संकेतस्थळासाठी वापरु शकाल. आपल्याला केवळ marathiinternet.inच्या ठिकाणी त्या विशिष्ट संकेतस्थळाचा पत्ता टाकावा लागेल. त्यानंतर स्पेस देऊन नेमहीप्रमाणे आपल्या मनातील ‘कीवर्ड’ टाईप करुन शोध घ्याव. अशाने केवळ त्या विशिष्ट संकेतस्थळांतर्गत असलेली पाने आपल्या समोर येतील.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016