संशोधनार्थ नोंदी टिपणे
गेल्या शतकात इंग्रजांनी जगभर राज्य केले आणि आता त्यांची इंग्लिश भाषा जगावर राज्य करत आहे, याला तशी काही कारणे आहेत. इंग्लिश लोकांची आभ्यासक वृत्ती हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. इंग्लिश लोक प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्मतेने आभ्यास करतात. त्यानंतर त्यांचे त्याबद्दलचे विचार आणि त्यातून झालेला उलगडा ते लिहून ठेवतात. त्यामुळे या जगास नवीन गोष्टींची ओळख होते आणि त्यांची भावी पिढी त्या ज्ञानात अधिकची भर घालते.
प्रत्येक व्यक्तिकडे काही अंगभूत गूण असतात. प्रत्येकाला कशाबद्दलतरी कुतूहल वाटत असते. त्यासंदर्भात त्याचे स्वतःचे असे काही विचार असतात. ते त्याने लिहून काढायला हवेत. त्यासंदर्भात उपलब्ध माहिती गोळा करायला हवी. आपल्याला ज्या विषयात रस आहे, त्याबद्दल संशोधनार्थ नोंदी, टिपणे घ्यायला हवीत. त्यांच्या मदतीने आपले स्वतंत्र विचार जगासमोर मांडायला हवेत. ही वृत्ती अंगी बानवल्यास ती व्यक्ति माणूस म्हणून समृद्ध होते.
असो! संशोधनार्थ नोंदी कशा घ्यायच्या? हा आजच्या या लेखाचा विषय आहे. आजच्या काळात लेख, चित्रफीत, ध्वनिफीत, छायाचित्र, चित्र, अशा अनेक माध्यमांतून विविध प्रकारची माहिती ही आपल्यापर्यंत पोहचत असते. आपल्याला अशा एका व्यवस्थेची गरज आहे, जिथे आपणास या सर्व गोष्टी एकत्र जमा करुन ठेवता येतील. शिवाय पुन्हा सारेकाही सहजतेने सापडावे याकरिता विषयानुरुप वर्गवारीही करता यायला हवी.
सर्व प्रकारच्या नोंदींचा संग्रह व वर्गिकरण करणे
सर्व प्रकारच्या नोंदींचा संग्रह व वर्गिकरण करायचे झाल्यास ‘एव्हरनोट’ (Evernote) या सेवेचा वापर करावा. एखाद्या विषयावर संशोधन करत असताना आवश्यक ती माहिती आपण एव्हरनोटमध्ये एकत्र गोळा करु शकतो. evernote.com हे या सेवेचे संकेतस्थळ आहे. याशिवाय एव्हरनोटचे स्वतःचे असे संगणक सॉफ्टवेअर, मोबाईल अनुप्रयोग (Application) आणि वेब ब्राऊजर एक्सटेंन्शनही आहेत.
एव्हरनोटमध्ये वेगवेगळ्य़ा विषयांकरिता वेगवेगळ्या डिजिटल वह्या (Notebook) तयार करता येतात. वेब ब्राऊजर एक्सटेंन्शनच्या सहाय्याने आपण इंटरनेटवरील पाने एव्हरनोटमधील या वह्यांमध्ये साठवू शकतो. याखेरिज लिखित मजकूर, रेखाकृती, हे देखील एव्हरनोटमध्ये जोडता येतात. संशोधनाच्या दृष्टिने आवश्यक अशा ध्वनिफिती, चित्रफिती, छायाचित्रे, एव्हरनोटवर अपलोड करता येतात. पण एव्हरनोटच्या मोफत खात्यास अपलोड संदर्भात दरमहा ६० एमबी इतकी मर्यादा आहे. जमा केलेल्या सर्व टिपणांचे आपण Category आणि Tagच्या माध्यमातून वर्गिकरण करु शकतो. एकंदरीत विचार करता, सर्वप्रकारच्या नोंदी घेण्याकरिता सध्यातरी एव्हरनोटहून चांगला असा पर्याय नाही. त्यामुळे एव्हरनोट एकदा वापरुन पहा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016