SBI ATM केंद्रात पैसे जमा करणे
आपण ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ATM केंद्रात पैसे जमा करु शकतो. पण त्यासाठी ATM मशिनचा उपयोग करता येत नाही. पैसे जमा करण्यासाठी खास वेगळ्याप्रकारचे यंत्र असते. या यंत्राला ‘कॅश डिपॉझिट मशिन’ म्हणजेच CDM असे म्हणतात. प्रत्येक ATM केंद्रात आपल्याला पैसे जमा करायचे यंत्र आढळणार नाही. काही ठराविक ATM केंद्रांमध्ये ATM मशिनशेजारी अशाप्रकारचे यंत्र दिसून येते. पैसे जमा करायचे यंत्र (CDM) कोणत्या ATM केंद्रांमध्ये आहे? ते आपण ऑनलाईन तपासू शकतो. या सुविधेमुळे आपल्या खात्यात दिवसातून कधीही पैसे जमा करता येतात. आपण अगदी सार्वजनिक सुट्टीदिवशीही पैसे जमा करु शकतो. नोकरदार लोकांसाठी ही एक चांगली सोय आहे. अशाने खास पैसे भरण्यासाठी बँकेत जावे लागत नाही.
पैसे भरण्याकरिता CDM केंद्र हुडकणे
CDM यंत्राची सुविधा असलेले ATM केंद्र कसे हुडकावे? ते आता आपण पाहू. CDM केंद्र शोधण्यासाठी सर्वप्रथक CDM Locator या धाग्यावर जा. View CDM Locations यावर क्लिक करा. दिलेली सुचना वाचून PROCEEDवर क्लिक करा. आता नवीन पानावर SBI Finderचा एक नकाशा उघडेल. पानाच्या डाव्या बाजूस आपणास CDM हा पर्याय दिसेल, त्याची निवड करा. दिलेल्या जागी आपला Address टाईप करा. आपण तिथे केवळ आपल्या शहराचे नाव देऊ शकतो. सरतेशेवटी Searchवर क्लिक करा. आता शेजारील नकाशात आपल्याला SBIची CDM केंद्रे दिसतील. SBIच्या कोणत्या ATM केंद्रात CDMची सुविधा उपलब्ध आहे? ते आपणास हा नकाशामुळे समजेल.
ATM केंद्रात जाऊन पैसे भरणे
SBIची कॅश डिपॉझिट मशिन (CDM) कशी दिसते? ते आपण खालील चित्रात पाहू शकाल. आपल्याला अशा प्रकारच्या यंत्राच्या सहाय्याने आपल्या SBI खात्यात पैसे भरायचे आहेत. केवळ १००, ५०० आणि १०००च्या नोटाच या यंत्रात भरता येतात. शिवाय एकावेळी २००हून अधिक नोटा भरता येत नाहीत. अशाप्रकारे आपणास जास्तितजास्त ४९९०० रुपये भरता येतात. नोटा बर्यापैकी चांगल्या अवस्थेत असाव्यात. नकली नोट सापडल्यास CDM यंत्र ती नोट ठेवून घेते. नकली नोट संदर्भात आपल्याला एक पावती मिळते जी आपण बँक मॅनेजरला नंतर दाखवू शकतो. नोटेची अवस्था चांगली नसल्यास ती नोट यंत्र ठेवून घेत नाही. आपणास ती नोट लगेच परत मिळते.
बाकी हे यंत्र नक्की कसे काम करते? त्यासंदर्भातील चित्रफिती खाली देत आहे. पहिली चित्रफीत इंग्लिश भाषेत आहे, तर दुसरी चित्रफीत ही हिंदी भाषेत आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016