SBIकडून ऑफलाईन OTP
OTP म्हणजे One Time Password. ऑनलाईन व्यवहारात सुरक्षितता निर्माण व्हावी याकरिता त्याचा वापर केला जातो. One Time Password (OTP) हा केवळ एकदाच उपयोगात येतो, म्हणून त्यास तसे नाव देण्यात आलेले आहे. सहसा OTP हा SMSद्वारे आपल्या मोबाईलवर पाठवला जातो. पण अशाप्रकारची पद्धत ही पूर्णतः आपल्या मोबाईल नेटवर्कच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. कारण आपला फोन जर नेटवर्कच्या बाहेर असेल, तर आपल्याला OTPचा SMS मिळू शकणार नाही, आणि त्यायोगे आपणास आपला ऑनलाईन व्यवहार पूर्ण करता येणार नाही.
SBIमार्फतही ऑनलाईन व्यवहारांसाठी OTPचा वापर केला जातो. SBIचे जगभरात करोडो ग्राहक आहेत. तेंव्हा सहाजिकच अनेक ठिकाणी त्यांच्या ग्राहकांना मोबाईल नेटवर्कची समस्या भेडसावत असणार! यावर तोडगा म्हणून SBI म्हणजेच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने OTPसाठी एक स्वतंत्र अनुप्रयोग (Application) तयार केला आहे. State Bank Secure OTP असे SBIच्या या नवीन अनुप्रयोगाचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून इंटरनेटसहित किंवा इंटरनेटशिवाय OTP तयार करता येऊ शकतो. या अनुप्रयोगाच्या माध्यमातून OTP मिळविण्यासाठी मोबाईल नेटवर्कची काहीही आवश्यकता नाही. अधिक माहिती या इथे मिळेल (इंग्लिश) – State Bank Secure OTP App.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016