कूलपॅड नोट ३ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
येत्या काळात आपणास सर्व स्मार्टफोन्समध्ये ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’चा समावेश केलेला दिसून येईल. त्यामुळे भविष्यात आपल्याला अनेकानेक पासवर्डस् लक्षात ठेवावे लागणार नाहीत. याची सुरुवात आगोदरच झालेली असून बोटाचा ठसा ओळखणारे नवे स्मार्टफोन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कूलपॅड नोट ३ हा त्यापैकीच एक स्मार्टफोन आहे. बोटाचा ठसा ओळखणार्या या सुविधेमुळे आपण आपल्या फोनचे आणि अॅप्सचे कुलूप (Lock) अगदी सहजतेने उघडू शकतो. सध्या फोनपुरती मर्यादित असलेली ही सोय कालांतराने संकेतस्थळांनाही लागू होईल. गूगल त्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
‘कूलपॅड नोट ३’ची वैशिष्ट्ये
कूलपॅड नोट ३ हा एक बजेट स्मार्टफोन आहे व सध्या तो केवळ ९ हजार रुपयांना उपलब्ध आहे. हा एक ड्युअल सिम ४जी स्मार्टफोन असून यावर २जी, ३जी इंटरनेटही काम करते. किंमतीच्या मानाने या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये चांगली असून ती मी खाली एक एक करुन देत आहे.
- फिंगरप्रिंट स्कॅनर – या स्मार्टफोनमधील फिंगरप्रिंट स्कॅनरमुळे आपल्या स्मार्टफोनचे व अॅप्सचे कुलूप अत्यंत सहजतेने उघडते. शिवाय याचा वापर करुन ‘सेल्फी’ देखील घेता येतो.
- कॅमेरा – १३ मेगापिक्सेल मुख्य, तर ५ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा.
- स्क्रिन – ५.५ इंच आकाराची स्क्रिन. TFT IPS कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन. १२८० X ७२० पिक्सेल स्क्रिन रिझोल्युशन.
- ऑपरेटिंग सिस्टिम (OS) आणि प्रोसेसर – अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आणि १.३ GHz Cortex-A53 MT6753 Mediatek ऑक्टा कोअर प्रोसेसर.
- रॅम व मेमरी – कूलपॅडच्या या फोनची ३ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. शिवाय यात ६४ जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड चालू शकते.
- बॅटरी – ३००० mAH lithium-ion बॅटरी.
- आकार व वजन – १५.२ x ०.९ x ७.७ सेमी आकार आणि १६८ ग्रॅम वजन.
- वॉरंटी – उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.
हा स्मार्टफोन १० ऑक्टोबर २०१५ रोजी बाजारात आला असून वैशिष्ट्यांचा विचार करता हा एक आधुनिक फोन आहे. लोकांनी या फोनसंदर्भात मांडलेली एक हलकीशी समस्या म्हणजे गेम खेळत असताना हा फोन किंचित गरम होतो. पण माझ्या दृष्टीने ही काही फार मोठी समस्या नसून ९ हजार रुपयांपर्यंत जर आपल्याला एखादा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल, तर कूलपॅड नोट ३ हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016