वर्डवेब डिक्शनरीचे स्मार्टफोन अॅप
आपल्याला इंग्लिश भाषा शिकणे अवघड जाते, याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे चांगल्या ‘इंग्लिश – मराठी’ शब्दकोशांचा अभाव आहे. त्यामुळे मला वाटतं की, इंग्लिश शिकत असताना प्राथमिक अवस्थेत ‘इंग्लिश – मराठी’ शब्दकोशाचा वापर करण्यास हरकत नाही. पण थोडंफार इंग्लिश अवगत झाल्यानंतर मात्र ‘इंग्लिश – इंग्लिश’ शब्दकोशाचा वापर करावा. ज्या शब्दकोशात इंग्लिश शब्दांचा अर्थ हा इंग्लिशमध्ये सांगितला जातो, त्यास ‘इंग्लिश – इंग्लिश’ शब्दकोश असे म्हणतात. ‘वर्डवेब डिक्शनरी’ हा एक अशाचप्रकारचा शब्दकोश आहे.
गूगल प्ले स्टोअरमध्ये शब्दकोशांकरिता तसे अनेकानेक अॅप आहेत. पण वर्डवेबसंदर्भात माहिती देण्याचे कारण म्हणजे, हा शब्दकोश पूर्णतः मोफत असून यात जाहिराती नाहीत. शिवाय वर्डवेबचे अॅप हे सुटसुटीत व वापरण्यास सोपे आहे.
वर्डवेब शब्दकोश कसा वापरावा?
Dictionary – Wordweb हे अॅप आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करा. हे अॅप उघडल्यानंतर एखाद्या इंग्लिश शब्दाचा शोध घ्या. अशाने त्या शब्दाचा अर्थ आपल्यासमोर येईल. माझ्यासहित अनेकांना केवळ एकदा वाचल्याने शब्दार्थ लक्षात रहात नाहीत. तेंव्हा स्क्रिनच्या वरील बाजूस जे तार्याचे चिन्ह दिसत आहे, त्यावर स्पर्श करा. त्यामुळे तो शब्द आपल्या व्यक्तिगत शब्दसंग्रहात संग्रहित होईल. तार्याच्या चिन्हाशेजारी डावीकडे जे वहीसारखे चिन्ह आहे, तिथे आपला व्यक्तिगत शब्दसंग्रह आहे. त्यावर स्पर्श करताच आपण पाठांतराकरिता संग्रहित केलेले सर्व शब्द आपल्याला एकत्र दिसतील.

या अॅपच्या सेटिंग्जमध्ये (Settings) आपल्याला शब्दकोशासंदर्भातील इतर पर्याय दिसून येतील. या शब्दकोशाची एक मोठी मर्यादा म्हणजे यात एखाद्या शब्दासोबत त्याचा उच्चार दिलेला नाही. शिवाय या अॅपला इंटरनल मेमरी देखील थोडी अधिक लागते. पण हे अॅप आत्तापर्यंत १० लाखांहून अधिकवेळा उतरवले (Download) गेले असून त्यास ८० हजारहून अधिक लोकांनी मिळून ५ पैकी ४.५ गुण दिलेले आहेत.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016