व्हॉट्सअ‍ॅपला गप्प करा

अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा कामाव्यतिरीक्त अनावश्यक वापर करत असतात. या लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश हे काही काळवेळ पाहून अवतरत नाहीत. पण अशाने आपला मोबाईल उगाच सतत वाजत राहतो आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात नाहक व्यत्यय निर्माण होतो. वारंवार संदेश पाठवणार्‍या व्यक्तिला अथला ग्रुपला काही कारणाने अगदीच पूर्णपणे ‘ब्लॉक’ (Block) देखील करता येत नाही.

अशावेळी एक गोष्ट मात्र आपण निश्चितपणे करु शकतो! आपण त्यांना म्यूट (Mute) करु शकतो! जेणेकरुन आपल्याला त्यांचे संदेश तर मिळतील, पण व्हॉट्सअ‍ॅप त्याबाबत मौन धारण करेल. त्यानंतर आपणास सवडीने व्हॉट्सअ‍ॅप उघडून त्यावरील संदेश वाचता येतील.

व्हॉट्सअ‍ॅपला गप्प करण्याची कृती

  1. व्हॉट्सअ‍ॅप उघडा.
  2. ज्या ग्रुपला अथवा व्यक्तिला म्यूट करायचे आहे, तो चॅट उघडा.
  3. आता स्क्रिनच्या वरील बाजूस आपल्याला ग्रुपचे वा व्यक्तिचे नाव दिसत असेल, त्यावर स्पर्श करा.
  4. इथे Notifications विभागात आपल्याला Muteचा पर्याय दिसेल. तो सुरु करा.
  5. किती कलावधीसाठी म्यूट करावे? याबाबत विचारणा होईल. ८ तास, १ आठवडा, की १ वर्ष? आपल्या गरजेप्रमाणे कालावधी निवडावा. संदेश आल्याची सुचनाही मिळू नये याकरीता वाटल्यास Show notifications या पर्यायासोबत असलेले टिक मार्क काढून टाका आणि शेवटी OKवर स्पर्श करा.
म्यूट व्हॉट्सअ‍ॅप
व्हॉट्सअ‍ॅपला म्यूट करताना समोर आलेले पर्याय

आता ती व्यक्ति वा ग्रुप म्यूट झाल्याचे आपल्याला दिसेल. यापुढे त्यांच्याकडून एखादा नवीन संदेश जरी आला, तरी आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येणार नाही. पण दिवसाअखेर किंवा जेंव्हा वेळ असेल तेंव्हा! गुपचुप आलेले ते संदेश आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप उघडून पाहता येतील.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.