पेन ड्राईव्हचे प्रकार

अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते, पण तीच गोष्ट ठामपणे माहित नसते. अशावेळी मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे आपण त्यासंदर्भात सतत नवी माहिती मिळवायला हवी.

काल आपण मेमरी कार्डचे प्रकार पाहिले व सोबतच कोणते मेमरी कार्ड चांगले? हे देखील जाणून घेतले. आज आपण पेन ड्राईव्हचे प्रकार पाहणार आहोत आणि त्याबाबत थोडी अधिक माहिती घेणार आहोत. पेन ड्राईव्हमध्ये USB २.० आणि USB ३.० असे दोन मुख्य प्रकार आहेत. या दोन प्रकारच्या पेन डाईव्हज्‌मधील काही मुख्य फरक दृष्टीक्षेपाखालून घालू.

USB २.० आणि USB ३.० पेन ड्राईव्ह मधील फरक

  1. USB २.० हे २००० सालचे तंत्रज्ञान आहे, तर USB ३.० हे २००८ सालचे तंत्रज्ञान आहे.
  2. USB ३.०ची गती ही USB २.०हून साधारणपणे १० पट अधिक असते.
  3. USB ३.०मध्ये उर्जेचा अधिक कौशल्याने वापर केला जातो.
  4. USB २.०मध्ये माहितीचे आदान-प्रदान हे एकेरी मार्गावरुन चालते, तर USB ३.०मध्ये दुहेरी मार्ग उपलब्ध असतो. दुहेरी मार्गामुळे सहाजिकच माहितीची देवाण-घेवाण ही सहजतेने व गतिशीलतेने होते.
  5. USB ३.० पेन ड्राईव्हची किंमत ही USB २.०हून थोडी अधिक असते. पण त्यांच्या किमतीमध्ये फार मोठा फरक असतो अशातला भाग नाही.

USB ३.० हे USB २.०पेक्षा अधिक आधुनिक आहे. त्यामुळे सहाजिकच मी आपल्याला USB ३.० असलेला पेन ड्राईव्ह घेण्याचा सल्ला देईन.

माझ्या आवडीचा पेन ड्राईव्ह

ट्रँसेंड ३२ जीबी USB ३.० पेन ड्राईव्ह
Transcend (ट्रँसेंड) ३२ जीबी USB ३.० पेन ड्राईव्ह

मेमरी कार्डप्रमाणेच Transcend (ट्रँसेंड) कंपनीचे पेन ड्राईव्ह देखील स्वस्त आहेत. त्यामुळे मला स्वतःला जर १००० रुपयांच्या आसपास एखादा चांगला पेनड्राईव्ह घ्यायचा असता, तर मी Transcend 32GB JetFlash 700 Super Speed USB 3.0 Pen Drive (Black) या पेन ड्राईव्हची निवड केली असती.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.