मेमरी कार्डचे प्रकार
सध्या सणाचे दिवस सुरु असल्याने सर्वत्र सवलतींचा वर्षाव होत आहे. अनेकजण या दिवसांत वस्तू खरेदीचे नियोजन करतात. तेंव्हा त्यानिमित्ताने आपण विद्युत उपकरणांविषयी थोडं अधिक जाणून घेऊ. अशाने आपल्याला योग्य वस्तूची निवड करणे सोपे जाईल व आपणास ती वस्तू आत्मविश्वासाने खरेदी करता येईल.
‘मेमरी कार्ड’ जर आपण कधी नीट पाहिले असेल, तर त्यावर आपल्याला एका लहानश्या वर्तुळात २, ४, ६, १० यापैकी एक आकडा दिसला असेल. तो मेमरी कार्डचा ‘क्लास’ असतो. ‘क्लास १०’ प्रकारातील मेमरी कार्ड हे ‘क्लास ४’ प्रकारच्या मेमरी कार्डपेक्षा अधिक गतीमान असते. अशाप्रकारे मेमरी कार्डवर दिसणार्या त्या लहानश्या वर्तुळातील आकड्यावरुन आपल्याला मेमरी कार्डची कार्यगती समजते.
HD म्हणजेच ‘हाय डेफिनिशन’ प्रकारातील चित्रफीत काढत असताना अधिक गतीचे मेमरी कार्ड आवश्यक ठरते. त्यामुळे कॅमेरॅकरीता शक्यतो क्लास १० प्रकारातील मेमरी कार्डचा वापर होतो. आजकाल मोबाईल देखील स्मार्ट झाले आहेत, तेंव्हा क्लास ४ किंवा क्लास ६ प्रकारातील मेमरी कार्ड जरी बाजारात उपलब्ध असले, तरी शक्यतो क्लास १० प्रकारातील मेमरी कार्डच विकत घ्यावे.
मेमरी कार्डचा क्लास जसा वाढत जातो, तशी त्याची गती आणि किंमतही वाढत जाते. पण किंमतीमध्ये फार मोठा फरक पडतो अशातला काही भाग नाही. आजकाल चित्रफीत, छायाचित्र अशा सर्वच गोष्टींचा दर्जा वाढत आहे, तेंव्हा केवळ ८ जीबीचे मेमरी कार्ड न घेता शक्यतो १६ जीबी किंवा ३२ जीबी क्षमतेचे कार्ड विकत घ्यावे.
मेमरी कार्डमध्ये Transcend (ट्रँसेंड) हा माझा स्वतःचा आवडता ब्रँड आहे. कारण एक तर ही कंपनी चांगली असून या कंपनीचे मेमरी कार्ड्स हे इतरांहून स्वस्त असतात. माझ्याकडील सर्व मेमरी कार्ड्स Transcend कंपनीचे आहेत. आपण आपल्या गरजेप्रमाणे खरेदी करावी, पण माझ्या आवडीची काही उत्पादने खाली देत आहे.
मोबाईलसाठी* मेमरी कार्ड
- Transcend 16 GB Micro SDHC Card – Class 10 (किंमत – ४०० ते ५०० रुपये)
- Transcend 32 GB Micro SDHC Card – Class 10 (किंमत – ७०० ते ८०० रुपये)
कॅमेरॅसाठी* मेमरी कार्ड
- Transcend 16 GB SDHC Card – Class 10 (30MB/s) (किंमत – ५०० ते ६०० रुपये)
- Transcend 32 GB SDHC Card – Class 10 (30MB/s) (किंमत – ९०० ते हजार रुपये)
नोंद* – Micro म्हणजे लहान आकारातील मेमरी कार्ड. मोबाईलसाठी व कॅमेरॅसाठी केलेली विभागणी ही सर्वसाधारण असून मेमरी कार्ड विकत घेण्यापूर्वी आपल्याला लहान की मोठ्या आकारातील मेमरी कार्ड हवे आहे? याची खात्री करावी.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016