मेमरी कार्डवर आपोआप माहिती साठवणे
अनेकदा साध्या-सोप्या गोष्टी माहित नसल्याने मोठ्या समस्या उद्भवतात. यासंदर्भात आपल्याला ‘स्मार्टफोन मेमरी’चे उदाहरण घेता येईल. ‘स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होणार्या चित्रफिती, ध्वनिफिती, छायाचित्रे किंवा इतर फाईल्स या आपोआप कुठे साठवल्या जाव्यात? मेमरी कार्डवर की इंटरनल मेमरीवर?’, आपला स्मार्टफोन आपल्याला हा पश्न विचारतो. पण अनेकांना त्याचा थांगपत्ताच नसल्याने या सार्या फाईल्स आपोआप इंटरनल मेमरीमध्ये साठू लागतात. अशाने स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीवरील ताण वाढून आपला फोन हँग होऊ लागतो. हीच गोष्ट मी आता अधिक स्पष्ट करुन सांगतो.
आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. इथे Device विभागात Storage नावाचा पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. Default Write Disk मध्ये आपण कोणत्या पर्यायाची निवड केली आहे? ते पहा! आपण जर External SD Card म्हणजेच मेमरी कार्ड निवडले असेल, तर आपल्या सार्या फाईल्स या आपोआप मेमरी कार्डवर साठवल्या जात आहेत. पण आपण जर Internal SD Card निवडले असेल, तर याचा अर्थ असा की, सगळ्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनच्या इंटरनल मेमरीमध्ये साठवल्या जात आहेत. तेंव्हा External SD Card या पर्यायाची निवड करा.
आज सकाळी मी ‘व्हॉट्सअॅप संदेश मेमरी कार्डवर घेणे’ याबाबत माहिती सांगितली. तेंव्हा व्हॉट्सअॅपवरुन प्राप्त होणारे संदेश हे आपोआप आपल्या मेमरी कार्डवर साठवले जावेत अशी जर आपली ईच्छा असेल, तर वर सांगितल्याप्रमाणे External SD Cardची निवड करावी. एव्हढासा बदल केल्याने आपल्या स्मार्टफोनची एक मोठ्या समस्या सुटेल आणि त्यामुळे स्मार्टफोन हँग होणार नाही.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016