मोटो ई स्मार्टफोनची समिक्षा
मोटोरोला ही तशी एक जुनी व चांगली कंपनी आहे. मध्यंतरी ती दस्तुरखुद्द गूगलने चालवायला घेतली होती. त्यानंतर पुढे ती त्यांनी लिनोवोला विकली. त्यामुळे ज्यांनी मोटोरोला किंवा मोटो हे नाव आधी कधी ऐकले नसेल, त्यांनी हा एक ब्रँड नाही, असे समजण्याचे मुळीच कारण नाही. माझ्या स्वतःकडे मोटोरोलाचा स्मार्टफोन आहे, आणि त्याचा दर्जा पाहून तो एक ब्रँड असल्याचे मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो.
माझ्या मते मोटोरोला हा सगळ्यात स्वस्त आणि दर्जेदार ब्रँड आहे. मागच्या वर्षी मोटो ई या स्मार्टफोनची पहिली पिढी बाजारात उपलब्ध होती. त्यानंतर एका वर्षातच दुसर्या पिढीने पहिल्या पिढीची जागा घेतली. त्यामुळे आता आपल्याला बाजारात मोटो ई या स्मार्टफोनची दुसरी पिढी दिसेल. यातही ३जी आणि ४जी असे दोन प्रकार आहेत. या फोनची ३जी आवृत्ती ही ४जीहून एक हजार रुपये स्वस्त आहे. मी आधुनिक तंत्रज्ञानाचा भोक्ता आहे. त्यामुळे या लेखात आपण ४जी आवृत्तीचाच विचार करणार आहोत.
मोटो ई – द्वितिय पिढी (४ जी) या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
Moto E 2nd Generation 4G हा एक ड्युअल सिम (GSM + LTE) मोबाईल आहे. त्यातील LTE हे ४जी करिता आहे. या स्मार्टफोनची इतर वैशिष्ट्ये ही खालिलप्रमाणे आहेत.
- कॅमेरा – ५ मेगापिक्सेल मुख्य, तर ०.३ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा.
- स्क्रिन – ४.५ इंच आकाराची स्क्रिन. (Quarter HD IPS capacitive touchscreen) (कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन म्हणजे काय? यावर मी लवकरच एक लेख लिहिन). ९६० X ५४० पिक्सेल स्क्रिन रिझोल्युशन. (मला वाटतं ‘पिक्सेल’ बाबतही एक स्वतंत्र लेख लिहायला हवा).
- ऑपरेटिंग सिस्टिम (OS) आणि प्रोसेसर – Android v5 Lollipop ऑपरेटिंग सिस्टिम आणि १.२GHz Qualcomm Snapdragon ४१० क्वॉड कोअर प्रोसेसर, ४००MHz Adreno ३०६ GPU.
- रॅम व मेमरी – ‘मोटो ई’मध्ये १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी आहे. शिवाय यात ३२ जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड चालू शकेल.
- बॅटरी – २३९० mAH lithium-ion बॅटरी.
- वॉरंटी – उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.
मोटो ई (द्वितिय पिढी, ४जी) या स्मार्टफोनच्या मर्यादा
आधीच सांगितल्याप्रमाणे मोटो ई या स्मार्टफोनची पहिली पिढी ही मागील वर्षी बाजारात होती आणि त्यावेळी हा फोन जवळपास सर्वांनाच अतिशय आवडला होता. मोटो ई च्या या पिढीबद्दल मात्र अगदीच तसे म्हणता येणार नाही. या स्मार्टफोनचा मायक्रोफोन हा या फोनच्या मागील बाजूस आहे. त्यामुळे या फोनवरुन संभाषण करतेवेळी आपल्याला थोडंसं मोठ्याने बोलण्याची आवश्यकता पडू शकते. याव्यतिरीक्त हा फोन क्वचितप्रसंगी हँग होतो, रिस्टार्ट होतो अशी काही लोकांची तक्रार आहे. पण ही गोष्ट प्रत्येकाला लागू पडत नाही.
किंमत – ५९९९ रुपये (२८ ऑक्टोबर २०१५ अनुसार)
या फोनची किंमत, ब्रँड आणि वैशिष्ट्यांचा विचार केला, तर हा एक अतिशय उत्तम लो-बजेट स्मार्टफोन आहे. आपल्याला जर वर नमूद केलेल्या मर्यादांची फारशी पर्वा नसेल, तर मोटो ई (द्वितिय पिढी, ४जी) हा स्मार्टफोन विकत घ्यायला हरकत नाही. आज या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016