लावा आयरिस स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये
लावा, मायक्रोमॅक्स या अशा कंपन्या आहेत ज्यांना आपण अगदी ब्रँडचा दर्जा देऊ शकत नाही. पण त्यामुळे त्यांना तसे कमी लेखण्याचेही कारण नाही. कारण या कंपन्यांनी निर्माण केलेले फोन हे स्वस्त व समाधानकारक असतात. एखादी गोष्ट कमीतकमी किंमतीत उपलब्ध करुन द्यायची म्हटल्यावर कुठेतरी तडजोड ही करावीच लागणार!
आपल्यापैकी अनेकांनी मला लावा आयरिस स्मार्टफोन्सबाबत विचारलं होतं. हे फोन मी प्रत्यक्ष हाताळून पाहिलेले नाहीत, त्यामुळे मी त्यांची समिक्षा करु शकणार नाही. पण या लेखात आपण लावा आयरिस मालिकेतील चार स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांची तुलना करणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर लावा फोन घ्यायचा असेल, तर त्या कंपनीचे चांगले स्मार्टफोन मॉडेल निवडणे सोपे जाईल.
लावा आयरिस स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांची तुलना
आता आपण ‘लावा आयरिस एक्स वन सेल्फी’, ‘लावा आयरिस फ्युएल ५०’, ‘लावा आयरिस अल्फा एल’ आणि ‘लावा आयरिस एक्स ५ ४जी’ या चार स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांची तुलना करणार आहोत. खाली एक तक्ता दिलेला आहे. यात उभ्या रांगेत स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये आहेत, तर आडव्या रांगेत स्मार्टफोन्सची नावे आहेत. हा तक्ता स्मार्टफोनवर व्यवस्थित दिसणार नाही. तेंव्हा स्मार्टफोन वापरत असाल, तर वेब ब्राऊजरच्या पर्यायांमधून Desktop View हा पर्याय निवडावा. संगणकावर आणि टॅबवर मात्र खालील तक्ता व्यवस्थित दिसेल.
वैशिष्ट्ये/मॉडेल | लावा आयरिस एक्स वन सेल्फी | लावा आयरिस फ्युएल ५० | लावा आयरिस अल्फा एल | लावा आयरिस एक्स ५ ४जी |
किंमत (सुमारे) | ५५०० रु. | ६५०० रु. | ६८०० रु. | १०००० रु. |
ऑपरेटिंग सिस्टिम (OS) |
अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप | अँड्रॉईड v५ लॉलिपॉप | अँड्रॉईड v५ लॉलिपॉप | अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप |
प्रोसेसर | १.३ GHz + MediaTek, क्वॉड कोअर | १.३ GHz + Cortex-A7, क्वॉड कोअर | १.३ GHz + क्वॉड कोअर | १.३ GHz + MediaTek ६४ बिट, क्वॉड कोअर |
रॅम व मेमरी | १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी | १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी | १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी | २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी |
कॅमेरा | ८ मेगापिक्सल मुख्य, ५ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा | ८ मेगापिक्सल मुख्य, २ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा | ८ मेगापिक्सल मुख्य, २ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा | १३ मेगापिक्सल मुख्य, ८ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा |
स्क्रिन | आकार – ४.५ इंच, रिझोल्युशन – ४८० X ८५४ पिक्सेल | आकार – ५ इंच, रिझोल्युशन – ४८० X ८५४ पिक्सेल | आकार – ५.५ इंच, रिझोल्युशन – ५४० X ९६० पिक्सेल | आकार – ५ इंच, रिझोल्युशन – HD – १२८० X ७२० पिक्सेल |
बॅटरी | Li-Polymer, २००० mAh | Li-Polymer, ३००० mAh | Li-Polymer, ३००० mAh | Li-Polymer, २५०० mAh |
एकूण सिम – ३जी/४जी | ड्युअल सिम, GSM + WCDMA, ३जी | ड्युअल सिम, GSM + WCDMA, ३जी | ड्युअल सिम, GSM + WCDMA, ड्युअल स्टँडबाय, ३जी | ड्युअल सिम, GSM + LTE, ड्युअल स्टँडबाय, ३जी व ४जी |
वॉरंटी | उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने. | उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने. | उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने. | उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने. |
अधिक माहिती व चित्रे (अमेझॉन) | लावा आयरिस एक्स वन सेल्फी | लावा आयरिस फ्युएल ५० | लावा आयरिस अल्फा एल | लावा आयरिस एक्स ५ ४जी |
हे फोन प्रत्यक्ष वापरणार्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या असता असे समजते की, हे स्मार्टफोन्स अगदीच उत्कृष्ट नसले, तरी बर्यापैकी चांगले आहेत. आपल्यापैकी कोणी जर लावा आयरिस मालिकेतील एखादा फोन वापरत असेल, तर त्या फोनसंदर्भात खाली प्रतिक्रियेत आवर्जून आपले मत लिहावे. त्याचा इतरांना देखील फायदा होईल. मला विचाराल, तर अर्थातच मी आपल्याला वरील चार फोनपैकी ‘लावा आयरिस एक्स ५ ४जी’ विकत घेण्याबाबत सुचवेन.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016