लिनोवो वाईब पी१ एम स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

यापूर्वी आपण ‘लिनोवो वाईब पी१’ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. या फोनची वैशिष्ट्ये जरी उत्कृष्ट असली, तरी बाजारात त्याची किंमत १६ हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे हा फोन ‘लो-बजेट’ या प्रकारात मोडत नाही.  पण समजा आपल्याला जर त्याच प्रकारचा लो-बजेट स्मार्टफोन हवा असेल, तर ‘लिनोवो वाईब पी१ एम’ हा स्मार्टफोन घेता येईल. हा स्मार्टफोन पहिल्या फोनच्या निम्या किंमतीत, म्हणजेच केवळ ८००० रुपयांना मिळू शकतो. किंमतीच्या मानाने या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये देखील फारच चांगली असून या फोनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘लिनोवो वाईब पी१ एम’ची वैशिष्ट्ये

किंमतीशी तडजोड करत असताना स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांशी देखील कुठेतरी तडजोड करावी लागणार हे अगदी क्रमप्राप्तच आहे! त्यामुळे ‘वाईब पी१ एम’ या स्मार्टफोनमध्ये ‘वाईब पी१’प्रमाणे फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश केलेला दिसत नाही. शिवाय कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर, मेमरी अशा अनेक ठिकाणी यात काटसाकसर केलेली आहे. पण तरीदेखील किंमतीचा विचार केला, तर या फोनची वैशिष्ट्ये उत्कृष्ट अशीच आहेत.

लिनोवो वाईब पी१ एम
लिनोवो वाईब पी१ एम स्मार्टफोन असा दिसतो
  • कॅमेरा – ८ मेगापिक्सल मुख्य, तर ५ मेगापिक्सल समोरचा कॅमेरा.
  • स्क्रिन – ५ इंच आकाराची स्क्रिन. HD टचस्क्रिन. १२८० X ७२० पिक्सल स्क्रिन रिझोल्युशन.
  • ऑपरेटिंग सिस्टिम (OS) आणि प्रोसेसर – अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आणि १ GHz + MediaTek MT6735P ६४-bit क्वाड कोअर प्रोसेसर.
  • रॅम व मेमरी – लिनोवोच्या या फोनची २ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. शिवाय यात ३२ जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड चालू शकते.
  • बॅटरी – ३९०० mAH Li-Polymer बॅटरी.
  • आकार व वजन – १४.१ सेमी उंची x ७.१८ सेमी लांबी x ०.९५ सेमी जाडी आणि १४८ ग्रॅम वजन.
  • वॉरंटी – उपकरणासाठी १ वर्ष, अ‍ॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.

‘लो-बजेट’ स्मार्टफोनमध्ये ‘लिनोवो वाईब पी१ एम’ आणि ‘कूलपॅड नोट ३’ हे दोन चांगले स्मार्टफोन दिसत आहेत. तेंव्हा स्मार्टफोन घेण्यापूर्वी आपण ज्या काही स्मार्टफोन्सचा विचार कराल, त्यात या दोघांचा विचार करण्यास हरकत नाही.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.