सॅमसंग गॅलक्सी जे७ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
जगभरात आणि महाराष्ट्रात सॅमसंग ही एक आघाडीची स्मार्टफोन कंपनी आहे. शिवाय अनेकांच्या दृष्टीने सॅमसंग हाच एक ब्रँड आहे. तेंव्हा बर्याचजणांना सॅमसंग सोडून इतर कोणत्याही फोनचा विचार करायचा नसतो. प्रत्येकाची आपली अशी एक आवड असते. त्यामुळे या दिवाळीत किंवा नजिकच्या काळात जर आपण सॅमसंगचा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर मी आपल्याला ‘सॅमसंग गॅलक्सी जे७’बाबत सुचवेन! सध्या या स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपयांच्या आसपास असून लोकांचा या फोनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वप्रथम आपण या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहू!
‘सॅमसंग गॅलक्सी जे७’ची वैशिष्ट्ये
- कॅमेरा – १३ मेगापिक्सेल मुख्य, तर ५ मेगापिक्सेल समोरचा कॅमेरा.
- स्क्रिन – ५.५ इंच आकाराची स्क्रिन. सुपर AMOLED कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन. ७२० X १२८० पिक्सेल स्क्रिन रिझोल्युशन. २६७ ppi पिक्सेल घनता and १६M रंग.
- ऑपरेटिंग सिस्टिम (OS) आणि प्रोसेसर – अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आणि १.५GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर.
- रॅम व मेमरी – सॅमसंगच्या या फोनची १.५ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. शिवाय यात १२८ जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड चालू शकते.
- बॅटरी – ३००० mAH lithium-ion बॅटरी.
- वॉरंटी – उपकरणासाठी १ वर्ष, अॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.
सॅमसंग गॅलक्सी जे७ हा एक ड्युअल सिम (GSM + GSM) मोबाईल आहे. सध्या हा स्मार्टफोन कमीतकमी १५ हजार रुपयांना उपलब्ध आहे. पण या फोनची किंमत ही त्याच्या रंगावरही अवलंबून आहे. एकंदरितच या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांची तुलना जर त्याच्या किमतीशी केली, तर हा स्मार्टफोन विकत घेण्यास काही हरकत नाही.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016