स्वस्त आणि मस्त वाय-फाय राऊटर
एखाद्या कंपनीचे ब्रॉडबँड इंटरनेट हे एका केबलच्या सहाय्याने आपल्या घरापर्यंत पोहचवण्यात येते. त्यानंतर ती केबल घरातील वाय-राऊटर या उपकरणास व्यवस्थित जोडल्यास आपल्या घरात वायरलेस इंटरनेटचे एक मर्यादित क्षेत्र तयार होते. याचा अर्थ असा की, घरातील लॅपटॉप, स्मार्टफोन अश्या उपकरणांवर ब्रॉडबँड इंटरनेट वापरण्याकरीता कोणत्याही केबलची आवश्यकता भासत नाही. एकाचवेळी एकाहून अधिक उपकरणे इंटरनेटशी जोडण्याकरीता वाय-फाय राऊटरचा खूप चांगला उपयोग होतो.
केबल इंटरनेटसाठी वाय-फाय राऊटर
आजच्या काळात वाय-फाय हे एक तसे अत्यावश्यक उपकरण बनले आहे. हे उपकरण महत्त्वाचे असले, तरी ते फार महाग आहे, अशातला काही भाग नाही. TP-Link 300Mbps Wireless N Router हे वाय-फाय राऊटर अमेझॉनवर सध्या केवळ ९०० रुपयांना उपलब्ध आहे. या राऊटरला दोन अँटेना आहेत. त्यामुळे याचे प्रसारण क्षेत्र (Range) चांगले असून या राऊटची गती देखील चांगली आहे. या राऊटरवर ३ वर्षांची वॉरंटी आहे.
नोंद – हे राऊटर केबलच्या माध्यमातून पुरवल्या जाणार्या ब्रॉडबँड सेवेकरीता असून आपण जर टेलिफोन वायरच्या माध्यमातून देण्यात आलेले इंटरनेट (उदा. BSNL Broadband) वापरत असाल, तर त्याकरीता दुसर्या प्रकारचे राऊटर विकत घ्यावे लागेल.
टेलिफोन इंटरनेटसाठी वाय-फाय राऊटर
टेलिफोनच्या माध्यमातून जर आपल्याला इंटरनेट पुरवण्यात आले असेल, तर मोडेमचा समावेश असलेल्या राऊटरची आवश्यकता असते. त्यामुळे या प्रकारच्या राऊटरची किंमत ही थोडी अधिक असते. या प्रकारचे राऊटर घ्यायचे झाल्यास TP-Link 300Mbps Wireless N ADSL2+ Router हे राऊटर १६०० ते १७०० रुपयांपर्यंत विकत घेता येईल. यात वरील राऊटरमध्ये सांगितलेली सर्व वैशिष्ट्ये तर आहेतच, पण सोबतच यास पेन ड्राईव्ह (USB) लावण्याचीदेखील सोय आहे. TP-Linkच्या या उत्पादनावर ३ वर्षांची वॉरंटी आहे.
वर जे वाय-फाय राऊटर नमूद केले आहेत, त्यांच्यापेक्षाही स्वस्त वाय-फाय राऊटर बाजारात उपलब्ध आहेत. पण एकदा घेतलेले उपकरण हे आपण काही वर्ष तरी वापरतो. त्यामुळे ते घेत असताना केवळ किमतीकडे न पाहता ‘स्वस्त आणि मस्त’ याचा ताळमेळ साधायला हवा.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016