इंटरनल मेमरी – साधासोपा कॅश क्लिनर
इंटरनल मेमरी अपुरी पडू लागल्यावर नवीन अॅप इन्स्टॉल करणे अशक्य होऊ लागते. अशावेळी ‘कॅश क्लिअर’ (Clear Cache) करणे हा त्यावरील एक तात्पुरता व चांगला उपाय आहे. कॅश हटवल्याने आपल्या स्मार्ट उपकरणातील इंटरनल मेमरी काही प्रमाणात मोकळे होते व नवीन अॅप इन्स्टॉल होण्याची शक्यता वाढते.
स्मार्टफोनच्या Settings मधील Apps या विभागात आपल्याला स्मार्टफोनवर इन्स्टॉल केलेल्या अॅप्सची यादी दिसते. इथून आपण प्रत्येक अॅपचा कॅश (Cache) एक एक करुन क्लिअर करु शकतो, हटवू शकतो. पण हे एक वेळखाऊ काम आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कॅश हटवण्यात काही अर्थ नाही.
कॅश क्लिनर अॅप – क्षणात कॅश (Cache) हटवा
आपल्याला कॅश हटवणार्या अशा एखाद्या अॅपची गरज आहे, जे मुळात स्वतः जास्त इंटरनल मेमरी घेणार नाही व कॅश हटवण्याचे काम हे अगदी सहजतेने करेल. त्यादृष्टीने मला Cache Cleaner (कॅश क्लिनर) हे अॅप योग्य वाटते. हे अॅप वापरण्यास प्रचंड सोपे आहे. हे अॅप पूर्णतः मोफत असूनही या अॅपमध्ये कोणत्याही जाहिराती नाहीत.
‘कॅश क्लिनर’ इन्स्टॉल करा. हे अॅप उघडा. आपल्यासमोर एक अॅप्सची यादी येईल. सोबतच प्रत्येक अॅपने किती कॅश वापरला आहे? ते देखील दिसेल. ‘कॅश क्लिनर’ या अॅपच्या वरील बाजूस डिलीटचे चिन्ह आहे. त्यावर स्पर्श करताच आपल्या स्मार्टफोनवरील सर्व कॅश (Cache) हा एका झटक्यात हटवला जाईल.
आपल्यापैकी अनेकजण मला इंटरनल मेमरी कमी पडत असल्याचे सांगतात. पुष्कळ इंटरनल मेमरी असलेला नवीन चांगला स्मार्टफोन घेणे हा यावरील सर्वोत्तम दीर्घकालीन उपाय आहे. पण या समस्येवर एखादा चांगला तात्पुरता उपाय करायचा झाल्यास आपल्या स्मार्टफोनवरील कॅश हटवता येईल. अशाने इंटरनल मेमरी काही काळाकरीता काही प्रमाणात मोकळी होईल व आपली अडचण तेव्हढ्यापुरती दूर होईल.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016