स्वस्त अ‍ॅपल आय-फोन!

विंडोज स्मार्टफोन तितकेसे स्मार्ट नाहीत आणि अ‍ॅपलचे स्मार्टफोन प्रमाणाबाहेर महाग आहेत, त्यामुळे आपल्या इकडे स्वस्त आणि मस्त असे अँड्रॉईड स्मार्टफोन सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. स्मार्टफोनबाबत माहिती देत असताना मी अनेकदा अँड्रॉईड फोन असा स्वतंत्रपणे उल्लेखही करत नाही. कारण आपल्यापैकी बहुतांश लोक अँड्रॉईड फोन वापरतात हे मी गृहित धरलेलं असतं. पण अमेरिकेत मात्र आय-फोन हा अँड्रॉईड फोनपेक्षा अधिक लोकप्रिय आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप अशा उत्पादनांत ‘अ‍ॅपल’ हा ब्रँड जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. इतके दिवस त्याच्या आवाढव्य किमतीमुळे आपल्या आवाक्याबाहेर असलेला हा ब्रँड आता उतरलेल्या किमतीसह महाराष्ट्राच्या बाजारपेठेत चंचुप्रवेश करु लागला आहे.

अ‍ॅपल आय-फोन ४एस हे अ‍ॅपलच्या सर्वाधिक स्वस्त अशा स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन सध्या १३ ते १६ हजार रुपयांपर्यंत अमेझॉनवर ऑनलाईन उपलब्ध आहे. तेंव्हा आपण या स्मार्टफोनची काही प्रमुख वैशिष्ट्ये पाहू.

अ‍ॅपल आय-फोन ४एस या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

अ‍ॅपल आय-फोन ४एस हा फोन सध्या अ‍ॅमेझॉनवर केवळ १३ ते १४ रुपयांना उपलब्ध आहे. हा एक ३जी फोन आहे, यात ४जीची सुविधा नाही. या फोनची मेमरी ८ जीबी इतकी असून १६ जीबीचा फोन घ्यायचा झाल्यास तो १५ ते १६ हजार रुपयांना घेता येईल. ‘आय-फोन ४एस’ला ८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे, तर याचा समोरचा कॅमेरा हा ०.३ मेगापिक्सेलचा आहे. हा एक सिंगल सिम फोन आहे व तो २०११ सालच्या तंत्रज्ञानावर आधारलेला आहे. यास A5 Dual Core 800MHz प्रोसेसर आहे, पण या फोनची रॅम मात्र केवळ ५१२ एमबी इतकी आहे.

स्वस्त अ‍ॅपल आय-फोन
स्वस्त असा अ‍ॅपल आय-फोन ४एस

आपल्याला जर एक ब्रँड म्हणून हा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर आपण तो घेऊ शकाल. पण मला वाटतं आजकाल या किमतीत अँड्रॉईडमध्ये इतर अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.