लिनोवो वाईब पी१ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

आजकाल तंत्रज्ञान इतके गतीमानतेने बदलू लागले आहे की, नव्याने बाजारात आलेले स्मार्टफोन हे अवघ्या काही महिन्यातच जुने भासू लागतात. इथे प्रत्येक कंपनीला आपले वेगळेपण सिद्ध करुन प्रचंड मोठ्या अशा बाजारपेठेत आपला जम बसवायचा आहे. यातूनच स्मार्टफोन कंपन्यांमधील स्पर्धा ही शिगेला पोहचली आहे. शिवाय ऑनलाईन शॉपिंग साईट्समध्ये, क्रेडिट कार्ड कंपन्यांमध्ये सुरु असलेली स्पर्धा ती वेगळीच! पण यात अखेर ग्राहकाचाच फायदा आहे! कारण अशाने आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान शक्य तितक्या स्वस्त दरात उपलब्ध होते.

मागे एकदा आपण १५ हजार रुपयांच्या आसपास किंमत असलेल्या सॅमसंग गॅलक्सी जे७ या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहिली. आजही आपण १५ हजार रुपयांच्या आसपास किंमत असणार्‍या एका स्मार्टफोनची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पण या फोनच्या वैशिष्ट्यांची तुलना जर आपण सॅमसंगच्या फोनशी केली, तर त्या फोनपुढे सॅमसंगचा फोन हा अत्यंत फिका पडताना दिसतो. या स्मार्टफोनचे नाव ‘लिनोवो वाईब पी१’ असे आहे व तो नव्यानेच बाजारात आलेला आहे.

‘लिनोवो वाईब पी१’ची वैशिष्ट्ये

लिनोवो वाईब पी१ हा स्मार्टफोन सध्या १६००० रुपयांना बाजारात उपलब्ध असून एखाद्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर आजच्याप्रमाणे ऑफर सुरु असल्यास आपल्याला तो आणखी स्वस्त दरात मिळेल. फ्लिपकार्टवर SBIचे क्रेडिट अथवा डेबिट कार्ड वापरुन खरेदी केल्यास उद्यापर्यंत हा स्मार्टफोन आपल्याला १४५०० रुपयांपर्यंत मिळू शकेल. आता आपण लिनोवो वाईब पी१ या स्मार्टफोनची प्रमुख वैशिष्ट्ये पाहू.

लिनोवो वाईब पी१ स्मार्टफोन
लिनोवो वाईब पी१ स्मार्टफोन असा दिसतो
  • फिंगरप्रिंट स्कॅनर – या स्मार्टफोनमधील फिंगरप्रिंट स्कॅनरमुळे आपल्या स्मार्टफोनचे व अ‍ॅप्सचे कुलूप अत्यंत सहजतेने उघडले जाते.
  • कॅमेरा – १३ मेगापिक्सल मुख्य, तर ५ मेगापिक्सल समोरचा कॅमेरा.
  • स्क्रिन – ५.५ इंच आकाराची स्क्रिन. FHD १०८०p टचस्क्रिन. १२८० X ७२० पिक्सल स्क्रिन रिझोल्युशन.
  • ऑपरेटिंग सिस्टिम (OS) आणि प्रोसेसर – अँड्रॉईड v५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम आणि १.५ GHz स्नॅपड्रॅगन ६१५ – ६४ बिट ऑक्टा कोअर प्रोसेसर.
  • रॅम व मेमरी – लिनोवोच्या या फोनची २ जीबी रॅम व ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे. शिवाय यात १२८ जीबी पर्यंतचे मेमरी कार्ड चालू शकते.
  • बॅटरी – ४९०० mAH Li-Polymer बॅटरी.
  • आकार व वजन – १५.२९ x ०.९५ x ७.५६ सेमी आकार आणि १८७ ग्रॅम वजन.
  • वॉरंटी – उपकरणासाठी १ वर्ष, अ‍ॅसेसरीजबद्दल (बॅटरी, इ.) ६ महिने.

हा एक ड्युअल सिम (LTE + LTE) ४जी फोन आहे. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांचा, किंमतीचा व वापरकर्त्यांच्या समिक्षांचा विचार करता १५ हजार रुपयांच्या श्रेणीत हा एक अत्यंत उत्कृष्ट असा फोन आहे. अधीच सांगितल्याप्रमाणे आपण जर SBIचे (State Bank of India) डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरुन हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरुन विकत घेतला, तर लोनोवो वाईब पी१ हा स्मार्टफोन आपल्याला सवलतीच्या दरात मिळेल. उद्या या सवलतीचा शेवटचा दिवस आहे.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.