स्मार्टफोनवर MW रेडिओ केंद्र
FM रेडिओ केंद्राच्या सहाय्याने ठराविक अंतरावर अधिक परिणामकारकतेने रेडिओ सिग्नल पोहचवता येतात. त्यामुळे जगभरात सर्वत्र FM रेडिओ केंद्रांचे महत्त्व वाढत असताना दिसून येते. आज एखादे FM रेडिओ केंद्र हे आपल्या स्मार्टफोनचा वापर करुन अगदी सहजतेने ऐकता येते. पण सारी रेडिओ केंद्रे ही FM बँडच्या माध्यमातून प्रसारित होतात असे नाही. MW किंवा SW बँडवरील एखादे रेडिओ केंद्र जर ऐकायचे असेल, तर ते आपण स्मार्टफोनमधील रेडिओ अनुप्रयोगाचा (Application) वापर करुन ऐकू शकत नाही. म्हणून त्याकरिता दुसरा एखादा अनुप्रयोग वापरायला हवा. पण आपल्या स्मार्टफोनमध्ये मुळातच यासंदर्भातील हार्डवेअर नसल्याने दुसर्या अनुप्रयोगाच्या माध्यमातून रेडिओ ऐकण्याकरिता इंटरनेटची मदत घ्यावी लागते.
All India Radio LIVE यादृष्टीने एक उत्तम अनुप्रयोग आहे. हा एक मोफत अनुप्रयोग असून त्यात कोणत्याही जाहिराती नाहीत. All India Radio LIVE गूगल प्ले स्टोअरमधून आत्तापर्यंत एक लाखाहून अधिकवेळा उतरवला गेला असून त्यास ३ हजारांहून अधिक लोकांनी मिळून ५ पैकी ४.२ गुण दिलेले आहेत. या अनुप्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला काही इतर भाषिक केंद्रांसहित खालील चार केंद्रे ऐकता येतील.
- AIR Marathi
- AIR Vividh Bharati
- AIR FM Gold
- AIR FM Rainbow
प्रवाहवाणीला (Internet Radio) चित्रप्रवाहाइतके (Online Video) इंटरनेट लागत नाही. पण प्रवाहवाणीचा (Internet Radio) मनमुराद वापर करायचा झाल्यास आपल्याकडे अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट व वाय-फायची सुविधा असणे आवश्यक आहे.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016