मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग
वेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url हे अगदी लांबलचक असते. त्यामुळे इंटरनेटवरील पान आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करणे कठीण होऊन बसते. अशावेळी मोठे url छोटे करणे गरजचे ठरते.
url अगदी सहजतेने छोटे करता यावे यासाठी गुगलने आपली स्वतःची अशी एक खास सेवा निर्माण केली आहे. goo.gl या संकेतस्थळावर आपणास इंटरनेटवरील कोणत्याही पानाचे url देऊन त्याबदल्यात छोटे url मिळवता येते. यासंदर्भातील अनुप्रयोग गुगलने स्वतः तयार केला नसला, तरी इतर अनुप्रयोग विकासकांनी (App Developers) त्यासंदर्भातील अनुप्रयोग गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत. URL Shortener हा अशाप्रकारचा अगदी उत्तम अनुप्रयोग आहे.

मोठे url छोटे केल्याने ते वाटणे, शेअर करणे सोयीचे ठरते. परंतु केवळ एव्हढ्यापुरताच या गोष्टीचा उपयोग मर्यादित नाही. अशाप्रकारचे url वाटल्याने आपल्याला त्यासंदर्भातील विस्तृत अशी आकडेवारी उपलब्ध होते. उदाहरणार्थ, त्या धाग्यावर (Linkवर) एकूण किती क्लिक झाले? ते कोणत्या प्रदेशातून झाले? त्यासाठी कोणते वेब ब्राऊजर वापरण्यात आले? अशाप्रकारची विस्तृत आकडेवारी आपल्याला छोट्या urlच्या म्हणजेच Linkच्या किंवा धाग्याच्या माध्यमातून उपलब्ध होते.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016