हजारो इंग्लिश पुस्तके मोफत!
पूर्वीच्या काळी पुस्तकांचा खजिना हवा असेल, तर वाचनालयात जावे लागत असे. परंतु आजकाल आपल्या स्मार्टफोनवर डिजिटल वाचनालय उपलब्ध होऊ लागल्याने वाचनालयात जाण्याची तशी फारशी गरज उरलेली नाही. Gutenberg Books नावाचा अनुप्रयोग (ॲप) याबाबतचे एक उत्तम उदाहरण आहे. या अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.
लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी लेखकाची पुस्तके प्रताधिकार (कॉपीराईट) मुक्त होतात. म्हणजेच त्यावर कोणाचाही अधिकार न राहता ही पुस्तके समाजासाठी खुली होतात. Gutenberg Books सारखे अनुप्रयोग अशी सारी पुस्तके आपल्याला दर्जेदार स्वरूपात अधिकृतरित्या मोफत उपलब्ध करुन देतात.

Gutenberg Books हा अनुप्रयोग गुगल प्ले स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे. हा अनुप्रयोग वापरण्यास सुरुवात केल्यानंतर आपणास सुरुवातीला कदाचित तळाशी जाहिरात दिसेल. जाहिराती बंद करण्यासाठी या अनुप्रयोगाच्या Library विभागात (तळाशी तीन पुस्तकांचे चिन्ह) यावे. इथे वर उजव्या बाजूला सेटिंगचे चिन्ह आहे. तिथून सेटिंगमध्ये जावे. Upgrade to Gutenberg Pro या पर्यायावर स्पर्श करावा. या अनुप्रयोगासंदर्भात प्ले स्टोअरवर Review लिहून आपणास मोफत Upgrade करता येईल. त्यानंतर या अनुप्रयोगात जाहिरात दिसणार नाही, तसेच आपणास कितीही पुस्तके स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येतील.
रोहन
Latest posts by रोहन (see all)
- मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग - March 12, 2017
- हजारो इंग्लिश पुस्तके मोफत! - March 11, 2017
- बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे? - August 3, 2016
- मराठीचा इंटरनेटवरील विकास - July 30, 2016
- इंटरनेट आणि बातम्या - February 11, 2016