संगीत ओळखणारा अनुप्रयोग

मला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. इंग्लिश चित्रपटांमध्ये आपल्याकडील चित्रपटांप्रमाणे स्वतंत्रपणे गाण्यांचा वापर केला जात नसला, तरी त्यात प्रसंगानुरुप गाण्यांचा वापर केला जातो. अनेकदा इंग्लिश चित्रपट पहात असताना त्यात वापरण्यात आलेली गाणी (Soundtracks) आपलं लक्ष वेधून घेतात. पण त्यातील एखादे गाणे पुनः ऐकण्याकरीता शोधायचे झाल्यास त्याचे नाव कसे शोधावे!? तर मला स्वतःला अनेकदा ही अडचण जाणवलेली आहे! त्यामुळे आजकाल मी या कामाकरिता संगीत ओळखणार्‍या अनुप्रयोगाचा वापर करत आहे.

गाण्याचे नाव ओळखणे

साऊंडहाऊंड (SoundHound) असे या अनुप्रयोगाचे नाव आहे. हा अनुप्रयोग आत्तापर्यंत ५ करोडहून अधिक लोकांनी आपल्या स्मार्टफोनवर स्थापित (Install) केलेला असून पाच लाखांहून अधिक लोकांनी मिळून यास ५ पैकी ४.३ गुण दिलेले आहेत. त्यामुळे साऊंडहाऊंड हा अनुप्रयोग आपल्या स्मार्टफोनवर उतरवून (Download) स्थापित करण्यास हरकत नाही.

साऊंडहाऊंड - गाणे ओळखणे
साऊंडहाऊंड – संगीत ओळखणारा अनुप्रयोग

आपल्या स्मार्टफोनवरील साऊंडहाऊंड हा अनुप्रयोग उघडा. आपल्याला समोरच पिवाळ्या रंगातील एक वतृळाकार पर्याय दिसेल, त्यावर स्पर्श करा. अशाने हा अनुप्रयोग संगीत ऐकण्यास सज्ज होईल. ज्या गाण्याचे वा संगिताचे नाव जाणून घ्यायचे आहे, ते त्यास ऐकवा. ते संगीत काही सेकंद ऐकल्यानंतर साऊंडहाऊंड त्याबाबत शोध घेईल, आणि त्यानंतर गाण्याच्या नावासोबतच तत्संबंधी  अधिक माहिती (गीत, कलाकार, इत्यादी) पुरवेल. आपण एखादे गाणे गुणगुणूनही शोध घेऊ शकतो. पण अर्थात प्रत्येक गाणे अथवा संगीत या अनुप्रयोगाला सापडेलच असे नाही. आपण घेतलेल्या शोधांचा इतिहास हा अनुप्रयोग भविष्यासाठी जतन करतो.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.