SBI नेटबँकिंगने SBI क्रेडिट कार्डचे बिल भरा

आजच्या काळात नेटबँकिंगचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या बँक खात्याकरिता नेटबँकिंगची सोय सुरु करायला हवी. नेटबँकिंगची सुविधा सुरु केल्यानंतर नेटबँकिंगचे खाते वापरण्यास हळूहळू शिकून घ्यावे. सध्या आपण नेटबँकिंगच्या माध्यमातून क्रेडिट कार्डचे बिल कसे भरायचे? त्यासंदर्भात माहिती घेत आहोत. त्या अनुशंगाने काल आपण SBI नेटबँकिंगचे खाते SBI क्रेडिट कार्डशी जोडण्याबाबत जाणून घेतले. आता एकदा हे खाते जोडल्यानंतर SBI नेटबँकिंगच्या माध्यमातून SBI क्रेडिट कार्डचे बिल कसे चुकते करायचे? ते आत्ता आपण पाहणार आहोत.

SBI नेटबँकिंगने क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी पायर्‍या

१. onlinesbi.com वर जाऊन ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) मध्ये लॉग-इन करा.
२. वरच्या मेनूबारमधून Bill Payments हा पर्याय निवडा.
३. आत्ता आपण Pay Bills या विभागात आहात. इथून Without bill हा पर्याय निवडा.
४. आपणास Biller Name खाली SBI Cards असे दिसेल. SBI Cards ची निवड करुन Pay Bill वर क्लिक करा.
५. क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम दिलेल्या जागी नमूद करा.
६. Pay date समोरुन Now हा पर्याय निवडल्यास बिल लगेचच चुकते केले जाईल. अथवा Schedule या पर्यायाची निवड करुन आपणास भविष्यातील एखादी तारीख देता येईल. जेणेकरुन त्या तारखेस बिल आपोआप भरले जाईल.
७. ही महिती Submit करा. त्यानंतर आपणाकडून या माहितीची खातरजमा केली जाईल. Continue आणि Confirm करा. अशाने आपले क्रेडिट कार्डचे बिल हे नेटबँकिंगच्या माध्यमातून भरले जाईल.

SBI क्रेडिट कार्ड बिल भरणे
SBI क्रेडिट कार्डचे बिल SBI नेटबँकिंगच्या माध्यमातून भरणे

अशाप्रकारे चुकते केलेले बिल हे लगेचच क्रेडिट कार्डच्या खात्याअंतर्गत दिसणार नाही. त्यास ३ कामकाजीय दिवसांचा (3 Working Days) अवधी लागेल. भरलेले बिल क्रेडिट कार्ड खात्यांतर्गत दिसू लागल्यानंतर त्यासंदर्भात आपणास SMSच्या माध्यमातून सुचना मिळेल.

The following two tabs change content below.

रोहन

संस्थापक, संपादक, लेखक
रोहन हे एक अभियंता आहेत. ‘मराठी इंटरनेट अनुदिनी’च्या माध्यामातून ते इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन, अनुप्रयोग, उपकरणे इत्यादी विषयांची माहिती मराठी भाषेतून देत आहेत.